शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासाकरिता नियामक मंडळ आवश्यक का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:03 IST

ज्या शहरात मेट्रो बांधल्या जात आहेत, तिथे ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंटची देखील तरतूद आहे. ज्यात मेट्रो लाइनच्या ५०० मीटरच्या आत वाढीव एफएसआय मंजूर होतो. ही प्रक्रिया योग्यच आहे.

- सीताराम कुंटेमाजी मुख्य सचिव 

हाराष्ट्राच्या शहरी भागात जुन्या इमारती तोडून नवीन इमारती बांधण्याचा प्रकार सुरू आहे. त्याकरिता शासनाने वेगळे असे नियामक मंडळ स्थापन करावे किंवा कसे याबाबत माझा अभिप्राय येथे मांडत आहे. अलीकडच्या काळात जुन्या आणि जीर्ण इमारती पाडून आणि पुनर्विकासाच्या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अंतर्भूत उदार धोरणाचा, प्रामुख्याने वाढीव एफएसआयचा फायदा घेऊन आधुनिक इमारती बांधण्यात येत आहेत. 

ज्या शहरात मेट्रो बांधल्या जात आहेत, तिथे ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंटची देखील तरतूद आहे. ज्यात मेट्रो लाइनच्या ५०० मीटरच्या आत वाढीव एफएसआय मंजूर होतो. ही प्रक्रिया योग्यच आहे. कारण, त्यातून शहरांचे नवीनीकरण होते. मात्र, अनेक कारणांमुळे पुनर्विकासाचा गाडा रखडतो. वाद उद्भवतात. त्यांवर तोडगा काढणारी प्रभावी यंत्रणा आज अस्तित्वात नाही. 

सर्वात प्रथम जमिनीच्या मालकीचा वाद उद्भवतो. बहुतेक सोसायट्यांकडे जमिनीची मालकी नसते. मालकाला शोधण्यासाठी सोसायटीच्या लोकांची धडपड सुरू होते आणि मालक हयात नसेल, तर त्याच्या वारसांना शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. डिम्ड कन्व्हेयन्सचा कायदा असला, तरीही त्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार नसल्याने बराच कालावधी निघून जातो. जमिनीच्या संदर्भात महसुली अभिलेख देखील बऱ्याच वेळा संदिग्ध असतात. परिणामी प्रकल्प सुरू होण्यात अडचणी येतात. 

बऱ्याच प्रयत्नांती जमिनीच्या मालकीचा प्रश्न सुटतो व गरजेनुसार डीम्ड कन्व्हेयन्स मिळते. त्यानंतर सोसायटीचे सभासद किती?, त्यांच्या वाट्याचे क्षेत्र किती? ही निश्चिती करताना अडचणी येतात. सदनिकांची खरेदी-विक्री झालेली असल्यास त्या व्यवहारांची साखळी (चेन ऑफ ट्रॅन्झॅक्शन्स) उपलब्ध होत नाही. जुन्या काळी कमी स्टॅम्प ड्युटी भरून व्यवहार झाला असेल, तर गुंतागुंत वाढत जाते. त्यानंतर सभासद व बिल्डरांमध्ये वाटाघाटी होतात. त्यातून सभासदांमधले वाद चव्हाट्यावर येतात. 

सोसायटीऐवजी लोक अपार्टमेंट या व्यवस्थेत राहत असतील, तर सुरुवातीला डीम्ड कन्व्हेयन्सची तरतूदच नसायची म्हणून अडचणी यायच्या. मात्र, काही वर्षांपूर्वी कायद्यात सुधारणा करून ती तरतूद करण्यात आली. यानंतरच्या प्रक्रियेत  वाटाघाटीदरम्यान पुनर्बांधणीचा कालावधी, राहण्याची पर्यायी व्यवस्था, त्या कालावधीत बिल्डरांनी द्यावयाचे भाडे व नवीन बांधलेल्या इमारतीत सभासदांना मिळणारे क्षेत्रफळ इ. बाबत चर्चा होतात. अनेकदा सभासदांच्या अवाजवी मागण्या वा बिल्डरच्या आडमुठेपणामुळे बोलणी फिस्कटतात. या प्रकारांमुळे पुनर्विकास बराच रखडतो. परिणामी सभासदांचे हाल होतात आणि व्यावसायिकालाही कर्ज, व्याज आणि वाढत जाणाऱ्या किमतींमुळे नुकसान सोसावे लागते.

२००८-२००९ दरम्यान महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण लागू करण्याची प्रक्रिया चालू होती. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा होता रियल इस्टेट क्षेत्राकरिता नियामक संस्था स्थापन करण्याबाबत. मी तेव्हा गृहनिर्माण विभागाचा प्रधान सचिव होतो आणि मोठ्या हिरीरीने अशा नियामक संस्थेची कशी आवश्यकता आहे याविषयी वेगवेगळ्या व्यासपीठांवर माझे मत व्यक्त करीत होतो. त्याला काही जणांचे समर्थन मिळायचे, तर बिल्डरांच्या संस्थांकडून विरोध व्हायचा. ही नियामक यंत्रणा ‘रेरा’ या नावाने कालांतराने अस्तित्वात आली खरी, पण त्याची व्याप्ती नवीन प्रकल्प किंवा फारतर पुनर्विकास योजनेतील विक्री घटकांपुरती सीमित राहिली. पुनर्विकासाच्या संदर्भात ‘रेरा’ला अधिकार नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पुनर्वसन प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी एसआरए संस्था आहे, तर पात्र/अपात्रतेबाबतीत वाद मिटवण्यासाठी उच्चस्तरीय समिती आहे. 

मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींकरिता मुंबई रिपेयर बोर्ड अस्तित्वात आहे. अशा परिस्थितीत पुनर्विकासाच्या सर्व प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी एका प्राधिकरणाची गरज आहे, असे वाटते. ज्या प्रकारे ‘रेरा’मुळे गृहनिर्माण क्षेत्राला शिस्त लागली त्याच प्रकारे हे प्राधिकरण पुनर्विकास प्रक्रियेला शिस्त लावून प्रकल्पांना गतिमान करू शकते. यावर शासन स्तरावर व जाणकार लोकांमध्ये चर्चा व्हायला हवी.

English
हिंदी सारांश
Web Title : Need for a Regulatory Body for Redevelopment: Why it Matters

Web Summary : Redevelopment faces hurdles like land ownership disputes and member disagreements. A dedicated regulatory body, similar to RERA, is needed to streamline the process, enforce discipline, and accelerate redevelopment projects, benefitting both residents and developers.
टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग