शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

 होम लायब्ररी; पुस्तकांची काळजी कशी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 12:38 IST

वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यासाठी बनविलेले रॅक आणि त्याला जोडून मांडलेले टेबल वाचनासाठी वातावरण निर्मिती करतात.

मुंबई- धावपळीच्या जीवनात आपल्याला वाचनासाठी शांतता हवी, असे वाटू लागले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती लायब्ररी किंवा वाचनालय. वाचनाचा तासंतास आनंद लुटण्यासाठी वाचनालयासारखी उत्तम जागा दुसरी नाही. विशेषत: ज्या घरात शाळेत जाणारी मुले असतात, त्यांच्यासाठी घरात वाचनाचा एक निवांत कोपरा असणे आवश्यकच असते. एरव्हीही ज्यांना वाचनाची आवड असते, ते आपल्या घरात अशा छोट्याशा होम लायब्ररीला प्राधान्य देतात.

वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यासाठी बनविलेले रॅक आणि त्याला जोडून मांडलेले टेबल वाचनासाठी वातावरण निर्मिती करतात. या ठिकाणी आपण अनेक पुस्तकांचे वाचन करून ज्ञानार्जन करू शकतो. ज्यावेळी तुम्ही रोजच्या कटकटींना त्रासून जाता, तेव्हा या होम लायब्ररीमध्ये चहाचे मस्त घोट घेत, तुम्ही तुमच्या आवडत्या पुस्तकाच्या वाचनाचा आस्वाद घेऊ शकता. बघा...तुमच्या मनाचा कोपराही कसा फ्रेश होऊन जातो...

 

कशी असावी होम लायब्ररी?- सर्वप्रथम लायब्ररीसाठी शांत जागा निश्चित करा. शक्यतो, पाहुण्यांची खोली किंवा वर्दळीपासून लांब असे ठिकाण निश्चित करा.

- जेवढी जागा असेल, त्यानुसारच पुस्तकांचा भरणा करा. कमी जागा असेल, तर शक्यतो फोल्डिंगच्या शेल्फ बनवा. म्हणजे कमी जागेत जास्त पुस्तके राहतील.

- पूर्वी लायब्ररीसाठी वापरले जाणारे फर्निचर डार्क ब्राउन रंगाचे वापरले जायचे, पण आता इंटेरियरच्या जमान्यात ते मागे पडले आहे. तुम्हाला जो रंग आवडतो, प्रसन्नता देतो, त्यानुसार त्या रंगाचे फर्निचर तुमच्या लायब्ररीसाठी वापरू शकता. 

- जास्तीत जास्त पाच जणांना बसता येईल, एवढेच खुर्ची-टेबल किंवा सोफा लावा. उगाच जास्त भरणा केलात, तर गडबड गोंधळ होऊन तुमच्या लायब्ररीला काही अर्थच उरणार नाही. 

- या ठिकाणी आपण आपल्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी करू शकता. 

- इतरही शैक्षणिक व सामान्य ज्ञान वाढविणाºया पुस्तकांचा संग्रह करा. 

- रॅकमध्ये पुस्तके मांडताना अल्फाबेटनुसार पुस्तकांची मांडणी करा. म्हणजे तुम्हाला एखादे पुस्तक हवे असल्यास, जास्त शोधाशोध करावी लागणार नाही. 

- मनोरंजनात्मक पुस्तके उदा. कथासंग्रह, कादंबऱ्या, कवितासंग्रह यांसाठी वेगळे रॅक बनवा. जेणेकरून पुस्तकांच्या ढिगाऱ्यात शोधण्याची गरज न भासता, हवे ते पुस्तक चटकन मिळेल.

- ज्ञान वाढविणाऱ्या पुस्तकांचाही तुमच्या लायब्ररीत समावेश करा. 

- तुमच्या होम लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांचे कलेक्शन करा. जेणेकरून गरजेनुसार त्यांचा वापर करता येईल व तुमच्या ज्ञानातही भर पडेल. 

- या जागेचा वापर आपण दोन प्रकारे करू शकता. वाचनाच्या टेबलवर एखादा कॉम्प्युटर व  प्रिंटर ठेऊन आपण लायब्ररीबरोबरच होम ऑफिस म्हणूनही याचा वापर करू शकता. म्हणजे तुमचे एखादे महत्त्वाचे काम या ठिकाणी निवांतपणे करता येऊ शकेल.

- या ठिकाणी कृत्रिम प्रकाशाचा वापर करण्याऐवजी, जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश कसा येईल, याचा विचार करा. रात्रीच्या वेळीही पुरेशा प्रकाशाची व्यवस्था या ठिकाणी असावी, जेणेकरून तुमचे वाचन सुकर बनेल.

- जो कोपरा तुम्ही होम लायब्ररीसाठी निवडला आहात, त्याचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. 

- पुस्तकांची मांडणी अशा प्रकारे करा की, ती तुम्हाला दिसतील, तसेच पुस्तकांच्या आकारानुसार पुस्तकांची सुबक मांडणी करा. 

 

कशी घ्याल काळजी:- जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा या पुस्तकांवरील धूळ जरूर झटका. 

- पुस्तकांचे किडे, मुंग्या व कसर लागण्यापासून संरक्षण करा. 

- पुस्तके हाताळताना काळजीपूर्वक हाताळा. कशीही ओढून-ताणून पुस्तके काढू नका किंवा अस्ताव्यस्त फेकू नका.

- एखाद्या पुस्तकाचे कव्हर, पान निघाले असेल, तर लगेच गोंद घेऊन ते चिकटवा. अन्यथा हळूहळू पुस्तकांची पाने निखळून ते वाचण्यालायक राहणार नाही.

- एखादे पुस्तक वाचताना मध्येच उठून जावे लागल्यास, पाने दुमडून ठेवण्यापेक्षा बुकमार्कचा वापर करा. म्हणजे पुढच्या वेळी पुस्तक उघडताना ते सुस्थितीत असेल.

- पुस्तकांसाठी पेपरपिनचा वापर करू नका, तसेच डार्क मार्करचाही वापर टाळा. अन्यथा आपले पुस्तक कायमस्वरूपी खराब होऊन जाईल. ते पुस्तक दुसºया एखाद्याला हातात घेताना खराब वाटू शकते. 

- पुस्तक वाचताना जर तुम्हाला खायची सवय असेल, तर हे खाद्यपदार्थ पुस्तकांपासून दूर ठेवा. पदार्थाचे तेल लागल्यास पुस्तक कायमस्वरूपी खराब होऊ शकते. 

- पुस्तकांचे पाणी, वातावरणातील मॉश्चरपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षित कव्हर घाला. 

- पुस्तके उघडून एकावर एक ठेऊ नका. त्यामुळे त्यांची पाने फाटू शकतात. 

- आपल्या होम लायब्ररीपासून पाळीव प्राण्यांना दूर ठेवा. विशेषत: पाळीव प्राण्यांना पुस्तके किंवा कागद चावायची, चघळायची सवय असते, जी तुमच्या लायब्ररीला धोका निर्माण करू शकते. 

 

  

 

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगHomeघरlibraryवाचनालय