तरुणांच्या उन्नतीसाठी युवासेना बांधिल : सूरज मोगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:58+5:302021-09-13T04:29:58+5:30
चिपळूण : लोटे विभागात युवासेनेचे मजबूत संघटन होण्यासाठी युवासेनेतर्फे युवकांशी संवाद साधण्यात आला. यानिमित्ताने युवकांचे विविध प्रश्न आणि समस्या ...

तरुणांच्या उन्नतीसाठी युवासेना बांधिल : सूरज मोगरे
चिपळूण : लोटे विभागात युवासेनेचे मजबूत संघटन होण्यासाठी युवासेनेतर्फे युवकांशी संवाद साधण्यात आला. यानिमित्ताने युवकांचे विविध प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. युवकांच्या उन्नतीसाठी युवासेना बांधिल राहील, त्याचबरोबर शिवसेना पक्षवाढीसाठी गावागावांत युवासेना काम करणार आहे, असे मत लोटे विभाग अधिकारी सूरज मोगरे यांनी लोटे विभागात आयोजित युवासेना संवाद दौऱ्यात व्यक्त केले.
आगामी तीन-चार महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. शिवसेनेला बळकटी मिळावी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला एकहाती सत्ता मिळावी, यासाठी पक्षाचे मजबूत संघटन करण्याच्या सूचना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. त्यानुसार युवासेनेचे लोटे विभाग अधिकारी सूरज मोगरे यांनी लोटे जिल्हा परिषद गटात युवा संवाद दौऱ्याचे आयोजन केले होते. या उपक्रमाला लोटे उपतालुका अधिकारी चेतन वारणकर, धामणदेवी उपतालुका अधिकारी विक्रांत साने यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले.
या दौऱ्यानिमित्ताने लोटे, धामणदेवी, घाणेखुंट, चिरणी, आंबडस, धामणंद, भेलसई या गावांमध्ये युवकांच्या भेटी घेण्यात आल्या. युवकांसाठी रोजगार, व्यवसाय तसेच त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. घराघरांतील युवक युवासेनेशी जोडले जावेत, यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन मोगरे यांनी केले. या दौऱ्यात युवासेनेचे खेड तालुका सचिव शुभम मोरे, धामनंद विभाग अधिकारी सूरज रेवणे, धामणदेवी विभाग अधिकारी हर्षदीप आंब्रे, लोटे विभाग समन्वयक किरण ठसाळे, धामणदेवी आय. टी. सेल अधिकारी सुमित चव्हाण, लोटे शाखाधिकारी ओंकार चाळके, मयूर आंब्रे, सोहम मोरे, अक्षय मोरे, आकाश काते, प्रसाद सावंत, सूरज काते, अनिष जाधव, मकरंद कोवलकर उपस्थित होते.