तरुणांच्या उन्नतीसाठी युवा सेना बांधील : सुरज मोगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:46+5:302021-09-12T04:36:46+5:30

चिपळूण : लोटे विभागात युवा सेनेचे मजबूत संघटन होण्यासाठी युवा सेनेतर्फे युवकांशी संवाद साधण्यात आला. यानिमित्ताने युवकांचे विविध ...

Yuva Sena will build for the upliftment of the youth: Suraj Mogre | तरुणांच्या उन्नतीसाठी युवा सेना बांधील : सुरज मोगरे

तरुणांच्या उन्नतीसाठी युवा सेना बांधील : सुरज मोगरे

चिपळूण : लोटे विभागात युवा सेनेचे मजबूत संघटन होण्यासाठी युवा सेनेतर्फे युवकांशी संवाद साधण्यात आला. यानिमित्ताने युवकांचे विविध प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. युवकांच्या उन्नतीसाठी युवा सेना बांधील राहील, त्याचबरोबर शिवसेना पक्षवाढीसाठी गावागावात युवा सेना काम करणार आहे, असे मत लोटे विभाग अधिकारी सुरज मोगरे यांनी लोटे विभागात आयोजित केलेल्या युवा सेना संवाद दौऱ्यात व्यक्त केले.

आगामी तीन-चार महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. शिवसेनेला बळकटी मिळावी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला एकहाती सत्ता मिळावी, यासाठी पक्षाचे मजबूत संघटन करण्याच्या सूचना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. त्यानुसार युवा सेनेचे लोटे विभाग अधिकारी सुरज मोगरे यांनी लोटे जिल्हा परिषद गटात युवा संवाद दौऱ्याचे आयोजन केले होते. या उपक्रमाला लोटे उपतालुका अधिकारी चेतन वारणकर, धामणदेवी उपतालुका अधिकारी विक्रांत साने यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. या दौऱ्यानिमित्ताने लोटे, धामणदेवी, घाणेखुंट, चिरणी, आंबडस, धामणंद, भेलसई या गावांमध्ये युवकांच्या भेटी घेण्यात आल्या.

युवकांसाठी रोजगार, व्यवसाय तसेच त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. घराघरातील युवक युवा सेनेशी जोडले जावेत, यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन सुरज मोगरे यांनी केले. या दौऱ्यात युवा सेनेचे खेड तालुका सचिव शुभम मोरे, धामनंद विभाग अधिकारी सुरज रेवणे, धामणदेवी विभाग अधिकारी हर्षदीप आंब्रे, लोटे विभाग समन्वयक किरण ठसाळे, धामणदेवी आय. टी. सेल अधिकारी सुमित चव्हाण, लोटे शाखाधिकारी ओंकार चाळके, मयूर आंब्रे, सोहम मोरे, अक्षय मोरे, आकाश काते, प्रसाद सावंत, सुरज काते, अनिष जाधव, मकरंद कोवलकर उपस्थित होते.

Web Title: Yuva Sena will build for the upliftment of the youth: Suraj Mogre