शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
2
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
3
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
4
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
5
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
6
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
7
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
8
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
9
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
10
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
11
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
13
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
14
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
15
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
16
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
17
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
18
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
19
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
20
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, खानवलीतील तरुण पाच दिवसांनी मृतावस्थेत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:42 IST

मुंबई येथे खासगी नोकरीला हाेता. नवरात्राेत्सवाला आला होता गावी

लांजा : डॉक्टरकडे जातो म्हणून घरी सांगून घराबाहेर पडलेल्या खानवली येथील ३० वर्षीय तरुणाचा तब्बल पाच दिवसांनी शुक्रवारी (दि. १०) रस्त्याच्या गटारात दुचाकीसह मृतावस्थेत सापडला. ईश्वर रवींद्र सुर्वे (रा. खानवली-इवलकरवाडी, लांजा) असे त्याचे नाव आहे.ईश्वर सुर्वे मुंबई येथे खासगी नोकरीला हाेता. नवरात्राेत्सवाला तो खानवली येथे गावी आला होता. सोमवारी (दि. ६) डाॅक्टरकडे जातो असे सांगून ताे दुचाकी घेऊन सकाळी १० वाजता घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत ताे घरी न आल्याने घरच्या मंडळींनी नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, तो त्यांच्याकडे गेलेला नसल्याचे कळले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरची मंडळी व वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता तो कुठेच दिसला नाही. त्याला बाहेर दोन-चार दिवस राहण्याची सवय असल्याने तो मित्राकडे गेला असावा असे घरच्यांना वाटले हाेते.शुक्रवारी सकाळी सापुचेतळे - खानवली रस्त्यावर वाडीलिंबू साई मंदिराच्या मागे रस्त्याच्या गटारामधून दुर्गंधी येत असल्याचे खानवली येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी गवत बाजूला केले असता दुचाकी दिसली. त्याचवेळी ईश्वर याचे वडील याच रस्त्याने जात होते. त्याच्या वडिलांनी धीर करून पाहिले असता त्यांना दुचाकी आपल्या मुलाची असल्याचे लक्षात आले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

याबाबत लांजा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवकन्या मैदाड, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, नासिर नावळेकर, जान्हवी मांजरे, वैभवी नारकर, विष्णू मांजरेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ईश्वर सुर्वे याचा भाऊ वृषल सुर्वे यांनी लांजा पोलिस स्थानकात माहिती दिली. पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर करीत आहेत.

गवतामुळे ‘तो’ दिसला नाहीएक ते दोन मीटर दुचाकीसह ईश्वर रस्त्यावर फरफटत गटारात जाऊन गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रस्त्याच्या साइटपट्टीवर उंच गवत असल्याने अपघात होऊनही गटारात पडलेला जखमी ईश्वर कुणालाही न दिसल्याने वेळीच उपचार हाेऊ शकले नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Man found dead after telling family he was seeing doctor.

Web Summary : A 30-year-old man from Khanavali was found dead in a roadside drain five days after leaving home to see a doctor. Police are investigating the accidental death, suspecting injuries from an accident due to obscured visibility from roadside grass.