तरुणीवर बळजबरी करणाऱ्या तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST2021-07-07T04:39:47+5:302021-07-07T04:39:47+5:30

राजापूर : प्रेमसंबंधातून तरुणीच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजापूर तालुक्यातील ओणी येथील शैलेश मनोहर गोरूले (वय ३०, रा. ...

Young man arrested for raping young woman | तरुणीवर बळजबरी करणाऱ्या तरुणाला अटक

तरुणीवर बळजबरी करणाऱ्या तरुणाला अटक

राजापूर : प्रेमसंबंधातून तरुणीच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजापूर तालुक्यातील ओणी येथील शैलेश मनोहर गोरूले (वय ३०, रा. ओणी, गोरूलेवाडी) याला राजापूर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत २० वर्षीय पीडित तरुणीने राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणी आणि शैलेश गोरूले यांच्यामध्ये नातेसंबंध आहेत. या दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, शैलेश नात्यातील असल्याने पीडित तरुणी त्याला टाळत होती. त्यामुळे पीडित तरुणीने शैलेश याच्याशी बोलणे बंद केले होते. अशातच महिन्याभरापूर्वी पीडित तरुणी घराजवळील झाडावरील आंबे पाहण्यासाठी गेली हाेती. त्यावेळी शैलेशने तिच्यावर बळजबरी केल्याचे तरुणी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेईन, अशी धमकीही दिल्याचेही म्हटले आहे.

त्यानंतर सोमवार दि. ५ जुलैरोजी सकाळी ९ वाजण्याच्यासुमारास पीडित तरुणी आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना शैलेशने तिला रस्त्यात थांबवून फोन उचलत नसल्याचा जाब विचारून मारहाण केली. तसेच पीडित तरुणीच्या आईलाही शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार शैलेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वेंगुर्लेकर करत आहेत.

Web Title: Young man arrested for raping young woman