चिपळुणातील तरुण कार्यकर्त्यांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:31+5:302021-03-31T04:31:31+5:30

अडरे : युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बेसिक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवक काँग्रेस चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांच्या नेतृत्त्वाखाली साजिद ...

Young activists from Chiplun join the Youth Congress | चिपळुणातील तरुण कार्यकर्त्यांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश

चिपळुणातील तरुण कार्यकर्त्यांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश

अडरे : युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बेसिक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवक काँग्रेस चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांच्या नेतृत्त्वाखाली साजिद सरगुरोह या कार्यकर्त्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी स्वागत केले.

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा धवल मार्ट येथील सभागृहात नुकताच झाला. यावेळी युवा कार्यकर्ता साजिद सरगुरोह, वसीम सुर्वे, अश्फाक मोमीन, अल्ताफ काझी, मुस्तफा पटेल, हुजेर घारे, असलम खान, फरहान तांबे, फरहान चौगुले, साद दळवी, जिशान चौगुले, मुदस्सर चौगुले, आयान आलेकर, शहनवाज पोटे, अजीम मुजावर, फैजान खान, शफीक खान, सैफ काझी आदी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या सर्वांचे सत्यजित तांबे, सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, प्रशांत यादव, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, फैसल पिलपिले आदींनी स्वागत केले.

Web Title: Young activists from Chiplun join the Youth Congress