खुशी हरधारेची योगा राज्यस्तरावर निवड

By Admin | Updated: November 22, 2014 00:10 IST2014-11-21T22:32:25+5:302014-11-22T00:10:52+5:30

ती नाशिक येथे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

Yogas chooses Yogas at the state level | खुशी हरधारेची योगा राज्यस्तरावर निवड

खुशी हरधारेची योगा राज्यस्तरावर निवड

चिपळूण : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेतल्या गेलेल्या शालेय विभागस्तरीय योगासन स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणमधील खुशी प्रसाद हरधारे हिची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती नाशिक येथे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या विभागस्तरीय योगासन स्पर्धेत तिने यश संपादन केले. या यशाबद्दल सोसायटीचे सर्व संस्था चालक प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णात शिंदे, उपमुख्याध्यापक दादा पाटील, दिलीप सपाटे, विजया पुजारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. प्रशालेचे क्रीडाप्रमुख सोमनाथ सुरवसे, समीर कालेकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: Yogas chooses Yogas at the state level