शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉ टे ल्स

By admin | Updated: July 6, 2014 23:55 IST

पर्यटनकेंद्रीत संकल्प हवा...

रत्नागिरी : हॉटेल व्यवसायात वृध्दी आणायची असेल तर पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न दिसणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हॉटेलसाठी विविध ‘संकल्प’ असणे गरजेचे असल्याचे मत जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.आगामी अर्थसंकल्पाविषयी हॉटेल व्यावसायिकांच्या मनाचा कानोसा घेतला असता अनेकांनी पर्यटन वृध्दीवरच बोलणे पसंत केले. हॉटेल व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी पर्यटनाचा हातभार लागणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील लोकं रत्नागिरीकडे वळतील आणि त्याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना मिळू शकेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांसाठी जाचक कर आकारण्यात येत आहे. तो कमी होणे गरजेचे आहे. हा सेवाकर कमी झाल्यास सेवा देताना ग्राहकांना त्या अत्यल्प दरात देणे सोयीस्कर होईल, असे हॉटेल व्यावसायिकांना वाटते.केरळ, गोव्यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढले आहे. त्यामुळे तेथे हॉटेल व्यवसाय बहरलेला दिसून येतो. रत्नागिरीकडेही पर्यटन वाढत आहे. मात्र, ते म्हणावे तेवढ्या प्रमाणात वाढलेले नाही, त्यावर अर्थसंकल्पात भर दिला गेल्यास रत्नागिरी जिल्ह्यातही हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येतील, अशी आशा या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सीआरझेडच्या कायद्यामुळे सागरकिनारी हॉटेल व्यवसाय उभारण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कोकणला बीच लाभूनही त्याचा वापर करता येत नाही, त्यावरही उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.