शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

शिवछत्रपती पुरस्कारावर रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 17:15 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील याशिका शिंदे, आरती कांबळे, प्रणव देसाई आणि अपेक्षा सुतार या खेळाडूंना क्रीडा जगतातील मानाचा शिवछत्रपती राज्य ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील याशिका शिंदे, आरती कांबळे, प्रणव देसाई आणि अपेक्षा सुतार या खेळाडूंना क्रीडा जगतातील मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गाैरविण्यात आले. एकाचवेळी चाैघांनी या पुरस्कारावर आपली माेहाेर उमटवली आहे.महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पुणे येथील बालेवाडीत आयाेजित केलेल्या या पुरस्कार साेहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती हाेती. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील चाैघांनी या क्रीडा पुरस्कारावर आपली माेहाेर उमटवली. यामध्ये रत्नागिरी शहरातील  आरती कांबळे आणि अपेक्षा सुतार या खाे-खाे पटूंचा समावेश आहे. त्याचबराेबर चिपळूण तालुक्यातील कादवड गावातील याशिका शिंदे हिने रायफल शुटींग क्रीडा प्रकारात तर संगमेश्वर तालुक्यातील काेंढ्ये येथील प्रणव देसाई याला दिव्यांग मैदानी स्पर्धेतील कामगिरीवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रत्नागिरीतील चारही खेळाडूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जाेरावर पुरस्कारावर आपले नाव काेरले आहे. त्यांचे नाव रत्नागिरीच्या इतिहासातील पानावर काेरले गेले आहे.

याशिका शिंदेचिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कादवड गावातील याशिका विश्वजित शिंदे हिने रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात  पुरस्कार मिळवला आहे. विशेष म्हणजे तिचे वडील व आत्या यांनाही एकाच वर्षी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. आता दत्ताराम शिंदे यांच्या दोन्ही मुलांनी व नातीने हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे. विश्वजित शिंदे यांना रायफल शूटिंग, तर नंदा देसाई यांना मल्लखांबमध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आरती कांबळेरत्नागिरीतील आरती कांबळे हिने खो-खो खेळामध्ये क्रीडा प्रकारातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळविला आहे. आरती रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी असून, इयत्ता सातवीत असल्यापासून खो-खो खेळत आहे. आत्तापर्यंत तिने राष्ट्रीय स्तरावरील अठरा स्पर्धेत यश संपादन केले आहे. तिला विनोद मयेकर, पंकज चवंडे, संदीप तावडे, यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले आहे. शाळेपासून खो-खो खेळत असताना तिने कष्ट, चिकाटीतून यश संपादन केले आहे.

प्रणव देसाई

संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्ये येथील प्रणव प्रशांत देसाई याने मानाचा पुरस्कार पटकावला.  सध्या ठाणे येथे असणाऱ्या प्रणव देसाई याने सर्वप्रथम आपली मैदानी संघटनात्मक स्पर्धेची सुरुवात चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील दिव्यांग मैदानी स्पर्धेतून केली. त्याचे वडील प्रशांत देसाई यांनी प्रतिकूल स्थितीत त्याला पाठबळ दिले. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वेंकटेश करा, उदयराज कळंबे, संजय सुर्वे यांनी त्याला मार्गदर्शन केले.

अपेक्षा सुताररत्नकन्या अपेक्षा सुतार ही रा. भा. शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून, तिने पाचवीत असल्यापासून खो-खो खेळास सुरूवात केली. आत्तापर्यंत तिने २२ राष्ट्रीय, दोन आंतरराष्ट्रीय-  स्पर्धेतून यश संपादन केले आहे. खो-खो खेळातील नामवंत जानकी व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळविले आहे. तिच्या आत्तापर्यंतच्या यशामुळे मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तिला विनोद मयेकर, संदीप तावडे, पंकज चवंडे यांचे प्रशिक्षण लाभले आहे. यशात आईवडिलांचे योगदान मोठे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी