कामगारांसाठी लसीकरण केंद्र हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:23+5:302021-05-23T04:31:23+5:30
२. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराने रत्नागिरी जिल्ह्यात शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. हे ...

कामगारांसाठी लसीकरण केंद्र हवे
२. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराने रत्नागिरी जिल्ह्यात शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. हे रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. शासकीय रुग्णालयात ३ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे या आजाराचा संसर्ग वाढल्यास फार वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. आधीच कोरोनाची स्थिती हाताळताना आरोग्य यंत्रणेची फार दमछाक झाली आहे. तरीही आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करून रुग्णांना सेवा देत आहे.
३. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम शासकीय संस्थांमध्ये सुरू आहे. काही खासगी रुग्णालये यांच्याकडूनही कोरोना लसीकरण केंद्रासाठी मागणी होत आहे. या संदर्भात ज्या खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावयाचे आहे त्यांनी लसीकरण केंद्रासाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत. मात्र, त्यासाठी शासन निर्देशानुसार आवश्यक त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.