स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरलेत, तुम्ही ही कामाला लागा; रवींद्र फाटकांचा कार्यकर्त्यांना सल्ला
By मनोज मुळ्ये | Updated: December 14, 2023 16:40 IST2023-12-14T16:38:20+5:302023-12-14T16:40:56+5:30
रत्नागिरी : शिवसेना संघटना सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. संघटना भक्कम ...

स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरलेत, तुम्ही ही कामाला लागा; रवींद्र फाटकांचा कार्यकर्त्यांना सल्ला
रत्नागिरी : शिवसेना संघटना सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. संघटना भक्कम करून वाढविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरले असून, तुम्ही ही कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार रवींद्र फाटक यांनी कार्यकर्त्यांना दिला.
जिल्ह्याच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आणि आढावा बैठक रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. यावेळी माजी आमदार तथा रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
ते पुढे म्हणाले की, महिलांच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम असून मोठे निर्णय ते घेत आहेत. शासनाच्या योजना संघटनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे रवींद्र फाटक म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. रत्नागिरी मतदार संघ उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली भगवेमय करा, असे सांगत आपली लोकसभेच्या उमेदवारीची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.