शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायातून महिलांना उन्नतीचा मार्ग

By admin | Updated: January 2, 2015 00:09 IST

विकासाकडे झेप : दोन बचत गटांच्या एकोप्यातून शेती-भाजीपाला लागवडीचा प्रयोग

ग्रामीण भागातील महिलांनाही आता बचत गटाचे महत्व कळायला लागले आहे. अगदी डोंगराळ व दुर्गम भागातही शेती आणि फळलागवड करून अनेक महिला चांगल्या व्यवसायातून स्वावलंबी होत आहेत. मात्र, या महिलांना मार्गदर्शनाचीही तेवढीच गरज असते. योग्य मार्गदर्शन मिळाले तर या महिला चांगल्या तऱ्हेने आपला आर्थिक विकास करू शकतात, हे या महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीच्या काठावर वसलेले आंजणारी हे लहानसे गाव. मात्र, या महिलांमधील कष्टातून आर्थिक विकास करण्याची जिद्द महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी प्रज्ञा पवार यांनी ओळखली. या छोट्याशा गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १० फेब्रुवारी रोजी माता रमाई आणि सावित्रीबाई फुले असे महिलांचे दोन बचत गट तयार करण्यात आले. या दोन्ही गटांच्या एकूण २० सदस्य आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गटांचे सदस्य एकोप्याने राहतात. माता रमाई गटाच्या अध्यक्षा वनिता कांबळे दोन्ही गटाच्या कामकाजाकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. दरमहा या बचत गटांची सभा घेणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे आदी जबाबदाऱ्या त्या स्वत: घेतात. या बचत गटाच्या सदस्या प्रत्येक महिन्याला ५० रूपये बचत करतात. मात्र, या बचतीतून आज त्यांचा विकास चढत्या आलेखाने होत आहे. येथील महिलांनी शेती करतानाच भाजीपाला लागवड करण्यास सुरूवात केली. या भाज्यांना परिसरातून चांगली मागणी आहे. त्यामुळे या भाज्यांची विक्रीही चांगल्या प्रमाणात होत आहे. आपल्या व्यवसायाचे स्वरूप वाढविण्यासाठी या महिलांना आर्थिक सहायाची गरज होती. या महिलांना बँकेने सहायाचा हात पुढे करून १ लाख रूपये मंजूर केले. प्रत्येक महिन्याला पाच हजार रूपये इतका हप्ता होता. मात्र, कष्ट करण्याची तयारी असलेल्या या महिलांनी नित्यनेमाने त्याची परतफेड अवघ्या ३ वर्षात केली. या दोन्ही गटांनी महिला सदस्यांसाठी अंतर्गत कर्जसुविधाही उपलब्ध करून दिली आहे. यातून महिलांना निव्वळ १० हजार रूपयांचा नफाही मिळतोे. या महिला अंतर्गत कर्जाचीही परतफेड नियमित करतात. त्यातूनच बचत गटाला उत्पन्न मिळत असते. या बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंंडळाचे सतत मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे त्यांना विविध योजनांची माहिती होण्यास मदत होते. या महिलांना सहयोगिनी प्रज्ञा पवार यांचे सहकार्य मिळत असते. बचत गटाच्या एका महिला सदस्याने स्वत:चा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला असून, यातही चांगला नफा मिळत आहे. यासाठी या महिलेला लांजा येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्र्गदर्शन मिळाले. स्वत:चा व्यवसाय उभारण्याची मानसिकता आणि आत्मविश्वास आता या महिलांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या महिला आधुनिक शेती आणि भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर करू लागल्या आहेत. शेती व भाजीपाला चांगल्या व सोप्या पद्धतीने करता यावा, यासाठी आॅक्टोबर २०१३ मध्ये माता रमाई बचत गटातर्फे ट्रॅक्टर मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यासाठी लागणारी सर्व कागदपत्र पाली लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक उपेंद्र दळी व सहयोगिनी प्रज्ञा पवार यांनी मिळवून देण्यास सहकार्य केले. यासाठी गटातर्फे ३१००० एवढी रक्कम समाजकल्याण विभागाकडे जमा करण्यात आली होती. ही रक्कम महिलांनी आपल्या या व्यवसायातून केलेल्या बचतीतून उभी केली. त्याचे फळ म्हणून माता रमाई बचत गटाला समाजकल्याण विभागातर्फे ट्रॅक्टर देण्यात आला आहे. त्यामुळे आता शेती व विविध फळभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे या महिलांना शक्य होणार आहे. नव्या वर्षात व्यवसाय वाढून बचत गटाला आर्थिक उन्नती साधता यावी, या उद्देशाने दोन्ही बचत गटांना वेगवेगळे व्यवसाय करायचे आहेत. - शोभना कांबळे