रत्नागिरी जिल्ह्यात येणार ‘महिला सरपंचराज’
By Admin | Updated: March 28, 2015 00:06 IST2015-03-27T22:02:31+5:302015-03-28T00:06:27+5:30
ठिकठिकाणी आरक्षण सोडत; देवरुख, खेडवर महिलांचे वर्चस्व, चिपळुणातही चुरस--प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद खुले

रत्नागिरी जिल्ह्यात येणार ‘महिला सरपंचराज’
चिपळूण : सावर्डे, खेर्डीचे सरपंचपद खुले राहिल्याने निवडणुका होणार चुरशीच्या, इच्छुक सुखावले
चिपळूण : तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींचे आरक्षण आज शुक्रवारी जाहीर करण्यात आले. अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांचा मागासप्रवर्ग १७, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव १८, खुला प्रवर्ग ४४, खुल्या प्रवर्गातील महिला ४५ अशा १३० ग्रामपंचायतीचे आरक्षण उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे व तहसीलदार वृषाली पाटील यांनी जाहीर केले. सावर्डे व खेर्डी या दोन ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथील चुरस वाढणार आहे.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आज सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, सभापती समीक्षा बागवे, नायब तहसीलदार टी. एस. शेजाळ, नायब तहसीलदार केतन आवले, महसूल नायब तहसीलदार सुजाता पाटील आदींच्या उपस्थितीत सरपंच आरक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली. अनुसूचित जाती महिलांसाठी नांदगाव खुर्द, पोसरे व कळवंडे या तीन ग्रामपंचायती राखीव झाल्या. तर अनुसूचित जातीसाठी शिरवली, कळमुंडी या ग्रामपंचायती राखीव झाल्या. अनुसूचित जमाती महिलांसाठी कादवड ग्रामपंचायत राखीव झाल्याचे जाहीर करण्यात आले.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती राखीव झाल्या. त्यामध्ये कापरे, पेढांबे, अलोरे, आकले, दहिवली खुर्द, कोकरे, खेरशेत, गाणे, खांडोत्री, तिवडी, दोणवली, ओमळी, पेढे, कोसबी, उभळे, उमरोली, परशुराम तर नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी १८ ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या. त्यामध्ये कळकवणे, आगवे, वहाळ, दुर्गवाडी, नवीन कोळकेवाडी, चिवेली, निरबाडे, आबिटगाव, गुळवणे, डेरवण, केतकी, मार्गताम्हाणे खुर्द, मालदोली, कुंभार्ली, कळंबवणे, पालवण, कात्रोळी, गोंधळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ४५ ग्रामपंचायती राखीव आहेत. त्यामध्ये मिरजोळी, कुडप, मुंढेतर्फे सावर्डे, वालोपे, धामणवणे, रिक्टोली, तळवडे, असुर्डे, कापसाळ, धामेलीकोंड, कोंडमळा, चिंचघरी, खडपोली, बामणोली, वाघिवरे, नागावे, कान्हे, अनारी, गुढे, वीर, डुगवे, रामपूर, रावळगाव, पाचाड, वैजी, खोपड, ढोक्रवली, येगाव, आंबतखोल, फुरुस, खरवते, टेरव, कळंबस्ते, मुंढे तर्फे चिपळूण, तिवरे, बोरगाव, तनाळी, नारदखेरकी, मालघर, गांग्रई, कुटरे, पोफळी, वेहेळे, शिरळ, तोंडली यांचा समावेश आहे. सर्वसाधारण खुल्या गटात ४४ ग्रामपंचायती राखीव आहेत. त्यामध्ये भिले, पिंपळी बुद्रुक, पाथर्डी, देवखेरकी, नांदगाव, निवळी, पिंपळी खुर्द, वडेरु, कोळकेवाडी, खेर्डी, मांडकी खुर्द, ओवळी, कालुस्ते खुर्द, शिरगांव, तुरंबव, ताम्हणमळा, पिंपळीतर्फे वेळंब, कालुस्ते बुद्रुक, कुशिवडे, कौंढरताम्हाणे, कळंबट, हडकणी, दहिवली बुद्रुक, बिवली, नायशी, सावर्डे, नांदिवसे, अडरे, पिलवलीतर्फे सावर्डे, दळवटणे, वालोटी, तळसर, कामथे, मुर्तवडे, कोंढे, ढाकमोली, मांडकी, खांदाटपाली, कोंडफणसवणे, मार्गताम्हाणे, निर्व्हाळ, भोम, मोरवणे, कामथेचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
टेरव, खोपडसारख्या काही ग्रामपंचायतीत सातत्याने महिला आरक्षण पडत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. विकासाला खीळ बसत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. प्रक्रिया रोटेशननुसार असल्याने त्याला इलाज नसल्याचे उपविभागीय अधिकारी हजारेंनी सांगितले. रोटेशननंतर जी संख्या कमी होती, त्यासाठी मुलांमार्फत चिठ्ठ्या उचलून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
आरक्षणाबाबत उपस्थित असलेल्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम पाहायला मिळाला. अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती खुल्या झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. परंतु, काही ग्रामपंचायतीत महिलाराज आल्याने तेथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ५० टक्के महिला आरक्षणामुळे प्रशासनालाही कसरत करावी लागली.
सावर्डे, खेर्डी, शिरगाव खुल्या प्रवर्गासाठी ---पोफळी सर्वसाधारण महिलेसाठी
अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १७, तर नागरिकांच्या मागासप्रवर्ग महिलांसाठी १८.
गुहागरात सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर ---देवरुखमध्ये अनेकांचे मनसुबे उधळले---सत्तेत सहभागी : ६४ ग्रुपग्रामपंचायतींवर महिला सरपंचराज येणार ---याखेरीज ४३ ग्रामपंचायती सर्वसाधारणसाठी खुल्या राहिल्या आहेत. त्यामध्ये लोवले, करजुवे, कोळंबे, चिखली, राजवाडी, कुरधुंडा, आंगवली, वांझोळे, गोळवली, कोंडिवरे, आंबवली, बामणोली, मेघी, कसबा संगमेश्वर, कुचांबे, कर्ली, घाटीवळे, पोचरी, काटवली, कुंभारखाणी बुद्रूक, हरपुडे, घोडवली, पांगरी, मारळ, तेऱ्ये, कोंडकदमराव, कोंडगाव, कासारकोळवण, पाटगाव, सांगवे, निवे बुद्रूक, करंबेळे तर्फ संगमेश्वर, बुरंबाड, ताम्हाणे, खडीकोळवण, परचुरी, ओझरखोल, कोसुंब, चोरवणे, भडकंबा, साखरपा, फणसवणे यांचा समावेश आहे.
लांजात सरपंचाचे स्वप्न धुळीस; आरक्षण जाहीर---जावळे दाभट गावांची अधिकाऱ्यांकडे कैफियत --सरपंच आरक्षण : महत्त्वाच्या सरपंचपदांकडे तालुकावासियांचे लक्ष --ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये धनगरवाड्यांचा कल महत्त्वाचा
दापोलीत राजकीय पक्षांचे धाबे दणाणले--राजकीय पक्षांचे धाबे दणाणले--पाजपंढरी गावात पुन्हा एकदा सर्वसाधारण राखीव असे आरक्षण पडल्याने या गावचे सरपंचपद रिक्त राहण्याची शक्यता आहे. आमची जात महादेव कोळी असल्याचे जात निहाय जनगणनेत लोकांचे म्हणणे आहे. मात्र, त्या गावात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने पुन्हा एकदा गावावर अन्याय झाला असून, २० वर्ष गाव सरपंचपापासून उपेक्षित आहे.
१०१ सरपंचपदांचे आरक्षण
राजापूर : ४९ पुरुष, ५२ ठिकाणी महिला सरपंच होणार
राजापूर तालुक्यातील जाहीर झालेल्या या आरक्षणात चांगलाच गोंधळ उडाला होता. काही गावात यापूर्वी पडलेली आरक्षणे पुन्हा जाहीर झाल्याने उपस्थित अनेक राजकीय मंडळींनी त्यावर हरकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सर्वस्वी माजी पंचायत समिती सदस्य भास्कर सुतार, मनोहर सप्रे, दीपक बेंद्रे यांचा समावेश होता. मात्र, हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहीर झाल्याने तुमच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कळवू व चुकीचे आरक्षण पडले असेल तर दुरुस्त करु असे आश्वासन देण्यात आले.