पोटलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:56 IST2017-11-20T00:56:35+5:302017-11-20T00:56:35+5:30

Woman killed in Potlawite attack? | पोटलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार?

पोटलेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार?

राजापूर : गोठ्यात गुरे सोडायला गेलेली महिला वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली. पार्वती महादेव कदम (वय ६०) असे तिचे नाव आहे. तालुक्यातील जांभवली-पोटलेवाडी गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
याबाबत, ग्रामस्थांकडून समजलेली माहिती अशी, राजापूर रोड रेल्वेस्थानकापासून दोन तीन किलोमीटरवर जांभवली-पोटलेवाडी गाव आहे. या गावात पार्वती महादेव कदम या आपल्या २२ वर्षाच्या मुलीसह राहत होत्या.
बिबट्याचा वावर
जांभवली-पोटलेवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. वन खात्याला कळवून ही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्या बिबट्यानेच पार्वती कदम यांना ठार केले असावे, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
वन अधिकारी, पोलीस दाखल
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पार्वती कदम ठार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी वन अधिकारी आणि पोलिसांना कळविली. रात्री उशिरा वन अधिकाºयांचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Woman killed in Potlawite attack?