जखमी महिलेला पाहण्यासाठी जाताना पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:53+5:302021-06-22T04:21:53+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : सासू-सुनेच्या भांडणात सुनेने धक्का दिल्याने पडून गंभीर जखमी झालेल्या सासूचा जागीच मृत्यू झाला़ ...

Woman dies after falling while going to see injured woman | जखमी महिलेला पाहण्यासाठी जाताना पडून महिलेचा मृत्यू

जखमी महिलेला पाहण्यासाठी जाताना पडून महिलेचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : सासू-सुनेच्या भांडणात सुनेने धक्का दिल्याने पडून गंभीर जखमी झालेल्या सासूचा जागीच मृत्यू झाला़ जखमी सासूला पाहण्यासाठी जात असताना पायरीवरून पडून प्राैढ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना (ताम्हणमळा, ता़ चिपळूण) येथे घडली़ अनिता अनंत जड्याळ (५५, रा़ ताम्हणमळा, पाथरवाडी) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे़

याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तालुक्यातील ताम्हणमळा येथे शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. तालुक्यातील ताम्हणमळा पाथरवाडी येथील वनिता जड्याळ व मानसी महेंद्र जड्याळ या सासू-सुनेमध्ये भांडण होऊन सासूला मारहाण झाली होती. त्यामध्ये वनिता रामजी जड्याळ (६५) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वनिता जड्याळ यांना पाहण्यासाठी शेजारी राहणाऱ्या अनिता जड्याळ जात हाेत्या़ त्याचवेळी त्यांच्या घराशेजारील पायरीवरून त्या पडल्या. यामध्ये त्यांच्या छातीला व तोंडाला जबर मार बसल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Woman dies after falling while going to see injured woman