विजेत्या शॉर्ट फिल्म कलाकारांचे सभापतींच्या हस्ते कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:42+5:302021-03-20T04:29:42+5:30
देवरूख : नर्मदा किडनी फाऊंडेशनने नुकत्याच घेतलेल्या अवयव दान या विषयावरील राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीमधील ...

विजेत्या शॉर्ट फिल्म कलाकारांचे सभापतींच्या हस्ते कौतुक
देवरूख : नर्मदा किडनी फाऊंडेशनने नुकत्याच घेतलेल्या अवयव दान या विषयावरील राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीमधील कलाकारांनी तयार केलेल्या गाठोडे आणि सोहळा या शॉर्ट फिल्म्सना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. यातील कलाकारांचा संगमेश्वरचे सभापती जया माने यांनी सत्कार केला.
ही संपूर्ण फिल्म साखरपा गावातच चित्रित करण्यात आली होती. यामध्ये अवयव दानाचे महत्व सांगण्यात आले होते. सुनील कदम आणि संतोष लोटणकर यांच्या संकल्पनेतून या दोन्ही शॉर्ट फिल्म्स तयार करण्यात आल्या होत्या. गाठोडे या फिल्मचे बापूजी हे दिग्दर्शक आहेत. दिलीपकुमार जाधव हे निर्माते आहेत. शीतल कदम या सोहळा शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या असून, त्याचे दिग्दर्शन रुपेश आणि सुनील यांनी केले आहे. या सर्वांचे जया माने यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
...............................
फोटो आहे.
फोटो ओळ: संगमेश्वर तालुका पंचायत समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या जया माने यांनी सर्व विजेत्या कलाकारांचे कौतुक केले.