शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:58 IST

Politics, Shiv Sena, Ratnagiri, gram panchayat रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देशिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीचे गणित सुटणार?

मनोज मुळ्येरत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेत वाटा देणार का, हाच मोठा प्रश्न कार्यकर्तांना पडला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकांपासून जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३९ जागा शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादीकडे १५, तर काँग्रेसकडे १ जागा आहे. भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नव्हती.

२०१७ सालापासून आतापर्यंत अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागा शिवसेनेने, तर दोन जागा राष्ट्रवादीने मिळवल्या. अर्थात तरीही शिवसेनेची तळागाळातील ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसली आहे.शिवसेनेची ताकद अधिक असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांना ते सोबत घेणार की, आपली ताकद कायम ठेवून स्वतंत्र लढणार, हा प्रश्नच आहे. निवडणुका जवळ आल्या तरी या तीनही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झालेली नसल्याने अजून हा प्रश्न अधांतरीच आहे.तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?राष्ट्रवादी आणि काँग्रेस यापैकी राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात काही ना काही ताकद आहे. काँग्रेस गेल्या काही वर्षात क्षीण झाली आहे. राष्ट्रवादीकडे ताकद असली तरी त्यालाही मर्यादा आहेत. त्या तुलनेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडी होण्यामध्ये अधिक स्वारस्य आहे. आता प्रश्न हाच आहे की, शिवसेना या पक्षांना सामावून घेणार का?स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेचा दबदबाजिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३५ जागा शिवसेनेकडे आहेत. १५ जागा राष्ट्रवादीकडे, तर १ जागा काँग्रेसकडे आहे. पंचायत समितीच्या ११० जागांपैकी ७३ जागा शिवसेनेकडे आहेत. २९ जागा राष्ट्रवादीकडे, ४ जागा भाजपकडे तर ३ जागा काँग्रेसकडे आहेत. तळागाळात शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. शिवसेनेने उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरीला मंत्रीपद दिले असल्याने त्यातूनही शिवसेनेने जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत.स्थानिक स्तरावर अजून आघाडी नाहीराज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अजून निवडणूक झालेलीच नाही. त्यामुळे अजून स्थानिक पातळीवर अशी आघाडी झालेलीच नाही. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीत निवडणूकपश्चात महाविकास आघाडी झाली आहे. मात्र, इतरत्र शिवसेनेने बाकी पक्षांना सोबत घेतलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये अजूनही शिवसेनेने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस