शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

किमान वेतन लागू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, मंत्री सामंतांचे कंत्राटी वाहन चालकांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:50 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांवर ६७ कंत्राटी चालक म्हणून गेली १८ वर्षे अखंडित सेवा करीत आहेत.

रत्नागिरी : ‘समान काम, समान वेतन’ या न्याय्य तत्त्वानुसार कंत्राटी वाहनचालकांचे मूळ वेतन १९,९०० असून, ते वाहन चालकांना लागू करण्याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांना राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या भेटीत दिले.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांवर ६७ कंत्राटी चालक म्हणून गेली १८ वर्षे अखंडित सेवा करीत आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाहिकांवर नेमलेल्या या कत्राटी चालकांना ठेकेदाराकडून १३ हजार ४४८ रुपये इतके मानधन देण्यात येते. किमान वेतन कायद्यानुसार वेळोवेळी वाढ करण्यात येणाऱ्या भत्त्यानुसार चालकांना मानधन अदा करणे सेवापुरवठादाराला बंधनकारक होते. मात्र, या चालकांना किमान वेतनतत्त्वानुसार मानधन अदा करण्यात येत नाही. किमान वेतनानुसार १९,९०० इतके मानधन मिळणे आवश्यक आहे.मानधन कमी देण्यात येत असून, तेही वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. सणासुदीलाही त्यांना मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. याबाबत अनेकदा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये जोरदार चर्चाही झाल्या आहेत. शिवाय कंत्राटदारालाही तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही त्यांना वेळेवेर मानधन तर मिळतच नाही. शिवाय शासनाच्या किमान वेतनानुसार ते देणे आवश्यक आहे. याबाबत पालकमंत्री सामंत यांची वाहनचालकांनी भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून १९,९०० मानधन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत