शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार

By मनोज मुळ्ये | Updated: February 28, 2023 11:55 IST

मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान

रत्नागिरी : गतवर्षी राजकारणात झालेल्या मोठ्या बदलांमुळे २०२४ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचे स्पष्टच आहे. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात यावेळी अधिक ताकदीने उतरण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रत्नागिरीतील टक्कर राज्यासाठी लक्षवेधी ठरेल.रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेना आधीपासूनच मोठा पक्ष आहे. मात्र आता ही ताकद विभागली गेली आहे. वर्षानुवर्षे ही जागा युती म्हणून भाजपकडे होती. त्यामुळे शिवसेनेमधून येथे आमदारकीसाठीचे नेतृत्व आतापर्यंत पुढे आलेले नाही. २०१४ मध्ये शिवसेना या जागेवर स्वतंत्रपणे उभी राहिली आणि तेव्हा उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तेव्हापासून येथील नेतृत्व त्यांच्याकडेच आहे.आता २०२४ च्या निवडणुकीत मात्र मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे. सद्यस्थितीत जे पदाधिकारी आहेत, ते पक्ष म्हणून आजवर खूप राबवले असले, तरी विधानसभा निवडणूक लढवणे आणि त्यातही मंत्री असलेल्या उदय सामंत यांना टक्कर देणे यासाठी ते तयारीचे नाहीत.

तालुक्यात संघटन मोठे असले, तरी कोणताही धोका पत्करण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी नाही. त्यामुळे येथे गुहागरचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. महिन्याभरापूर्वी रत्नागिरीत आलेल्या भास्कर जाधव यांनीही याबाबत सूतोवाच केले होते. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास रत्नागिरीतून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकUday Samantउदय सामंतBhaskar Jadhavभास्कर जाधव