शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

By admin | Updated: September 21, 2014 00:53 IST

डोक्यात घातली लोखंडी पाईप : राजापूर तालुक्यातील कोंढेतड येथील घटना

राजापूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून वृद्धाने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपचा प्रहार करून निर्घृण खून केल्याची घटना राजापूर शहरातील कोंढेतड भंडारवाडी येथे काल, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. सुनीता सखाराम पेडणेकर (वय ६०) असे वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आरोपी सखाराम नारायण पेडणेकर (६४) याला अटक केली आहे.कोंढेतड भंडारवाडी येथील सखाराम पेडणेकर पत्नी सुनीता हिच्यासह राहत होता. सुनीता हिचे कोणाशीतरी अनैतिक संबंध असावेत, या संशयावरून दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. शुक्रवारी नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला.यावेळी सखाराम याने तिला जवळच असणाऱ्या बांंबूच्या काठीने मारण्यास सुरुवात केली. सखाराम याने काठीने प्रथम सुनीता हिच्या पायांवर मारहाण केली. काठी मोडल्यानंतर त्याने पंख्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी पाईप सुनीताच्या डोक्यावर मारली. यात ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी राजापूरचे पोलीसपाटील गंगाराम मनोहर पवार यांना तसेच राजापूर पोलिसांना ही घटना फोनवरून कळविली. राजापूरचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बाहेर अंगणात सुनीताचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. पोलिसी खाक्या दाखविताच सखारामने सर्व प्रकार सांगितला व खुनासाठी वापरलेला व लपवून ठेवलेला लोखंडी पाईप पोलिसांच्या ताब्यात दिला. यानंतर पोलिसांनी सखारामला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनीही घटनास्थळी लागलीच भेट दिली. राजापूरचे पोलीस निरीक्षक अशोक जांंभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ओटणकर , हेड कॉस्टेबल एस. बी. नाईक, प्रकाश झोरे, आर. ए. गुरव , प्रसाद शिवलकर यांनी तपास केला. (प्रतिनिधी)समजूत काढली अन् जिवावर बेतली...!चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मृत सुनीताने १७ सप्टेंबरला राजापूर पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्रात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सखारामची समजूत काढण्यात आली होती; मात्र त्यानंतर फक्त तिसऱ्या दिवशीच सखारामने तिला संपविले आहे. या पावसाळ्यापूर्वी नव्यानेच बांधलेल्या घराला आतील दरवाजाची झडपे लावण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला व तो विकोपाला गेला होता.