शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

रत्नागिरीत घरगुती वादातून पत्नीवर चाकूचे वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 11:34 IST

Crime News RatnagiriNews-घरगुती वादातून पतीने पत्नीवर कांदा कापायच्या सुरीने पोटावर वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धवल कॉम्प्लेक्स आवारात घडली. आसावरी अमोल देसाई असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देरत्नागिरीत घरगुती वादातून पत्नीवर चाकूचे वाररत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घटना, घटनेनंतर खळबळ

रत्नागिरी : घरगुती वादातून पतीने पत्नीवर कांदा कापायच्या सुरीने पोटावर वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धवल कॉम्प्लेक्स आवारात घडली. आसावरी अमोल देसाई असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसावरी सध्या ८ वर्षांच्या मुलासोबत माहेरी राहत होती. तर तिचा पती अमोल देसाइ हा महाड येथे एमआयडीसी येथे कामाला होता. त्याचे रत्नागिरीतील नाचणे येथे घर आहे. आठच दिवसापूर्वी तो घरी आला होता. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यांचे पटत नसल्याने दोघेही वेगळे राहत होते.

सोमवारी सायंकाळी आसावरी बाजारात गेली होती. सायंकाळी धवल कॉम्प्लेक्स येथे ती परतली असता तिथेच इमारतीखाली पती उभा होता. तेथेच त्यांचे कडाक्याचे भांडण सुरू झाले. त्यावेळी अमोलने आधीच आणलेला कांदा कापायचा चाकू बाहेर काढून तिच्या पोटात खुपसला. त्यानंतर त्याने तिच्या हातावरही दोन वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी इमारतीखाली धाव घेऊन तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पती अमोल देसाई याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी