पावस : दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने पत्नी बडबडल्याच्या रागातून वृद्धाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना साेमवारी (१५ डिसेंबर) राेजी पावस (ता. रत्नागिरी) येथील सामंतवाडी येथे घडली. अशोक रामचंद्र वारीसे (वय ६०) असे वृद्धाचे नाव आहे.अशोक वारीसे यांना दारूचे व्यसन होते. सोमवारी रात्रीही ते दारू पिऊन घरी आले व पत्नीला शिवीगाळ करून बडबड करत होते. त्यावेळी पत्नीने त्यांना बडबड करू नका, असे सांगितले. तेव्हा दारूच्या नशेत अशोक वारीसे आपल्या खोलीत गेले व त्यांनी दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ ते बाहेर न आल्याने त्यांच्या मुलाने त्यांना खोली बाहेरून हाका मारल्या. परंतु, आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता.त्यानंतर त्यांच्या मुलाने खोलीचा दरवाजा तोडला. तो आतमध्ये गेला असता वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांना तातडीने खाली उतरवले पण ते काहीच हालचाल करत नसल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Summary : In Ratnagiri, an elderly man, Ashok Warise, died by suicide after arguing with his wife while intoxicated. Upset by her reaction to his drunken behavior, he locked himself in a room and hanged himself. Police have registered a case of accidental death.
Web Summary : रत्नागिरी में, एक वृद्ध व्यक्ति, अशोक वारिसे, ने नशे में पत्नी से बहस के बाद आत्महत्या कर ली। पत्नी की प्रतिक्रिया से परेशान होकर, उन्होंने खुद को एक कमरे में बंद कर लिया और फांसी लगा ली। पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है।