शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून तरुण डोहात बुडाला, राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:59 IST

सुमारे तीस फूट खाेल धबधब्याच्या डाेहात काेसळला

राजापूर : धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून १८ वर्षीय तरूण खाेल डाेहात बुडाल्याची घटना साैंदळनजीकच्या ओझरकाेंड (ता. राजापूर) येथे बुधवारी (३१ मे) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. नितीन मंगेश माेहिते (रा. साैंदळ, राजापूर) असे तरुणाचे नाव असून, गुरुवारीही त्याचा शाेध सुरू हाेता.नितीन मंगेश मोहिते आणि त्याचे काही सहकारी मित्र परिसर पाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडले होते. फिरत फिरत ते सौंदळनजीक ओझरकोंड येथील धबधब्यावर गेले हाेते. तिथे फेरफटका मारत असताना नितीन मोहिते याला उंचावरून सेल्फी काढण्याची इच्छा झाली. त्यासाठी ताे तेथीलच एका उंच खडकावर गेला हाेता. तिथे सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि सुमारे दोन फूट उंचावरून सुमारे तीस फूट खाेल धबधब्याच्या डाेहात काेसळला.अचानक घडलेल्या या प्रकाराने त्याचे सहकारी हादरून गेले. त्यांनी नितीनला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. नितीन डाेहात बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी धबधब्याच्या दिशेने धाव घेतली. बुडालेल्या नितीनचा ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे सापडला नाही. ग्रामस्थांनी गुरुवारीही (१ जून) त्याचा शाेध सुरू ठेवला हाेता. मात्र, त्याचा काेठेच शाेध लागला नाही.

स्कुबा डायव्हर दाखलधबधब्याच्या डाेहात बुडालेल्या नितीन माेहिते याचा शाेध घेण्यासाठी स्कुबा डायव्हर यांना बाेलावण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही त्याचा शाेध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबराेबर शासकीय यंत्रणेसह पाेलिस कर्मचारी व ग्रामस्थही शाेध कार्यात मदत करत हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू