आरोग्य कर्मचारी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:03+5:302021-04-11T04:31:03+5:30
- डाॅ. संघमित्रा फुले - गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी मुलाबाळांची काळजी वाढतेय पण... माझ्या घरी पती, नणंद ...

आरोग्य कर्मचारी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचे काय?
- डाॅ. संघमित्रा फुले - गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
मुलाबाळांची काळजी वाढतेय पण...
माझ्या घरी पती, नणंद आणि पावणेतीन वर्षांची दोन जुळी मुले आहेत. या क्षेत्रात असल्याने कामाचा भाग म्हणूनच आमचे कर्तव्य सुरूच आहे. त्यामुळे रुग्णालयातून थेट घरी जात असले तरी त्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही थेट मुलांकडे न जाता अंघोळ केल्यानंतरच त्यांना जवळ घेते.
- वैशाली पवार, परिसेविका,
माझी पत्नी आणि मी आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहोत. घरी आई-वडील, भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. आई-वडील, भाऊ यांना मधुमेह असल्याने सध्या आम्ही स्वत:च विलगीकरणात राहून संपर्क कमी केला आहे.
- शाईन मॅथ्यू, परिचर, रत्नागिरी
घरच्यांची धाकधूक वाढली
माझे पती आरोग्य विभागात काम करतात. त्यामुळे आमच्या आरोग्याच्या दृष्टीने तेही काळजी घेतात. आम्ही कोरोनाच्या अनुषंगाने योग्य खबरदारी घ्यायला शिकलोय. मात्र, गेले वर्षभर सतत भीतीचे सावट सोबत घेऊन सर्वच जगत आहोत.
- प्रियांका साळवी, रत्नागिरी
माझा मुलगा आरोग्य खात्यात आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर वाटलं की आता कोरोना संपला. मात्र, पुन्हा प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्याच्यासह आम्ही सर्वच योग्य ती खबरदारी घेतो. पण, काळजीही तितकीच वाटते.
- पार्वती सावंत, आरोग्य कर्मचाऱ्याची आई