रत्नागिरी मिरकरवाडा समुद्रकिनारी आढळला व्हेल मासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:29 IST2019-11-07T16:29:07+5:302019-11-07T16:29:54+5:30
रत्नागिरी शहारानजीक मिरकरवाडा येथील कस्टमच्या जेटीजवळ व्हेल जातीचा मासा गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने सापडला.

रत्नागिरी मिरकरवाडा समुद्रकिनारी आढळला व्हेल मासा
रत्नागिरी : रत्नागिरी शहारानजीक मिरकरवाडा येथील कस्टमच्या जेटीजवळ व्हेल जातीचा मासा गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने सापडला.
हा मासा मृतावस्थेत समुद्रकिनाऱ्यावर आला असून, या महाकाय माशाला पाहण्यासाठी सकाळीच स्थानिकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती. क्यार आणि माहा चक्रीवादळामुळे समुद्रातील वातावरण बदललेले आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम समुद्रातील माशांवर होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर महाकाय मासा आल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली होती. त्यामुळे मासा पाहण्यासाठी अनेकांनी याठिकाणी गर्दी केली होती. हा मासा नेमका कशामुळे मृत झाला याची उत्सुकता उपस्थितांना होती.