शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

शेतजमिनींसाठी नियम शिथील करू : अब्दुल सत्तार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:36 IST

farmar, Abdul Sattar, minister, konkan, Ratnagiri कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देखारभूमी बंधारे बांधण्याला प्राधान्य वाळू उत्खननाबाबत सकारात्मक भूमिका

मंडणगड : कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी सत्तार म्हणाले की, आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील खाडीकिनारी वसलेल्या जनतेच्या विविध समस्या व अडचणी आपल्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. खाडी किनाऱ्यावरील गावे व शेत जमिनीत खाडीचे पाणी शिरत असल्याने जमीन नापीक होत आहे.

याठिकाणी कांदळवन उगवत असल्याने शेतकरी भूमिहीन होऊ लागले आहेत. याबाबत सत्तार यांनी खारभूमी बंधारे बांधण्याबाबत असणाऱ्या मापदंडात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासन दरबारी वास्तव परिस्थिती मांडून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. खार बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जागा नापीक होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद असलेल्या जिल्ह्यातील चिरेखाणी अल्पावधीतच सुरू करणार असल्याचे संकेत दिले. आमदार योगेश कदम यांनी याविषयीची भूमिका मांडली असून, यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच चिरेखाणी सुरू होण्यार असल्याचे सत्तार म्हणाले.दापोली तसेच मंडणगड तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळात घरांचे, शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची पुनर्बांधणी करण्याकरिता वाळू हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सावित्री खाडीत वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जादा दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याचे आमदार कदम यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले.

सावित्री खाडीत पूर्वीचे निकष सांभाळून हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला परवानगी देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, आमदार योगेश कदम, शिवसेनेचे मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरीministerमंत्रीkonkanकोकण