शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांच्या विकासासाठी दर्जेदार कामे करू, मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:40 IST

मिरकरवाडा बंदर विकास कामाचे भूमिपूजन

रत्नागिरी : मच्छीमारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि काेकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आम्ही अतिक्रमणासारख्या कठाेर निर्णयांचीही भीती बाळगली नाही. आता या बंदराच्या आणि पर्यायाने येथील मच्छीमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामे केली जातील, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय मंत्रिपदाची शपध घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणाच्यादृष्टीने तसेच किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टीकोनातून पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये या मिरकरवाडा बंदराचा विकास हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता, असे ते म्हणाले.मात्र, याठिकाणी अतिक्रमणाच्या अडचणी समाेर आल्या. काहींनी आमच्याबद्दल तीव्र गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही ठाम राहिलाे आणि त्यामुळेच आजचा दिवस उजाडला आहे.आम्हाला येथे प्रत्येक बाबींचा विकास करावयाचा असून, येथे मासेमारी व्यवसायासाठी प्रशस्त इमारती उभ्या राहणार आहेत. खऱ्या अर्थाने मिरकरवाडा बंदराचा विकास साधणार आहे. येथे सक्षमीकरणासाठीही निधी खर्च करण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून तुमचे भविष्य घडविण्याचे काम करणार आहोत, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, महेश म्हाप, मत्स्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

एक वर्षात काम पूर्ण करामिरकरवाडा बंदराचे विकासाचे हाती घेतलेले काम एका वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांना दिली. हे काम दर्जेदार झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.