शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

Waterfalls in Konkan: आंबोली धबधब्याने वर्षा पर्यटन बहरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:42 IST

पर्यटकांना आवर घालताना पोलिसांची दमछाक

- अनंत जाधव, सावंतवाडीआंबोली हे वर्षा पर्यटनासाठी ‘हाॅट स्पाॅट’ मानले जाते. धबधब्यांचा नजराणा तर पर्यटकांना खुणावत असतो. त्यामुळे आंबोली घाटातील धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. उंच उंच धबधब्यांमुळे तर आंबोलीतील वर्षा पर्यटन बहरून जात असते.पावसाळ्यात आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी हजारो पर्यटक येत असल्याने प्रशासनाकडूनही अतिउत्साही पर्यटकांना लगाम घालण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. यातून काहीसा पर्यटकांचा हिरमोड होताना दिसतो. कारण शनिवारी व रविवारी आंबोलीत तुफान गर्दी असल्याने या गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. त्यामुळेच प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत.आंबोली हा वर्षा पर्यटनाचा हाॅट स्पाॅट मानला जातो. पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक हे आंबोलीत येतात. या पर्यटकांमध्ये विशेषत: कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील तर शेजारील बेळगाव, गोवा राज्यातूनही पर्यटक येत असतात. हे सर्व पर्यटक आपल्या खासगी गाड्या घेऊन येतात. आंबोलीतील धबधब्याकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न असतो. एकाचवेळी पर्यटकांच्या गाड्या आणि माणसे धबधब्यावर जायची म्हटली तर वाहतूक कोडींचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळेच सहसा प्रशासन अवजड वाहने किंवा पर्यटकांची वाहने ही एकाच ठिकाणी पार्क करण्यास भाग पाडते. त्यामुळेच आंबोलीत वर्षा पर्यटनादिवशी वाहतूक कोंडी होताना दिसत नाही.आंबोली घाटक्षेत्रात तब्बल सात ते आठ छोटे-मोठे धबधबे आहेत. या सर्व धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. यापूर्वी मुख्य धबधब्यावर गर्दी होताना दिसत होती. पण आता पर्यटक इतर धबधब्यांचा आनंद लुटत असल्याने एकाच धबधब्यावर गर्दी होताना दिसत नाही. या सर्व धबधब्यांना प्रशासनाकडून वेगळाच ‘लूक’ देण्यात आला आहे. या धबधब्यांवर पर्यटकांसाठी खास शिडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे धबधब्यावर चढलेला पर्यटक हळूहळू खाली येऊ शकतो, हे विशेष.

अतिउत्साही पर्यटकांना लगामआंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. या पर्यटकांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होत असते. पण आता पर्यटकांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना धबधब्यावर एन्ट्री ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटकांना लगाम लागला आहे.

माकडांना खाद्यपदार्थ दिल्यास कारवाईआंबोली घाटात मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. या माकडांना पर्यटक आपल्याकडील खाद्यपदार्थ देत असतात. पण आता वन विभागाकडून माकडांना खाद्यपदार्थ दिल्यास दंड आकारण्यात येईल, असे फलक लावण्यात आल्याने यावर थोडे निर्बंध आले आहेत.

वन विभागाची खास मोहीमवन विभागाने घाटात कचरा टाकणाऱ्यांना वेगवेगळे दंड लावले आहेत. त्यामुळे घाटातील कचरा कमी झाला आहे. तसेच वन विभागाचे कर्मचारीही आंबोली घाटात ठाण मांडून असतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटन