शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोरवणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, लघु पाटबंधारे विभागाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:49 IST

चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, त्याला गळती लागल्याने पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. मोरवणे नदीमध्ये हे पाणी सोडण्यात येत असून, या धरणाची पाहणी लघुपाटबंधारे विभाग तसेच आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार जीवन देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

ठळक मुद्देमोरवणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूलघु पाटबंधारे विभागाकडून पाहणी

चिपळूण : तालुक्यातील मोरवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, त्याला गळती लागल्याने पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. मोरवणे नदीमध्ये हे पाणी सोडण्यात येत असून, या धरणाची पाहणी लघुपाटबंधारे विभाग तसेच आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार जीवन देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.मोरवणे धरणाची क्षमता ३ टीएमसी असून, सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तिवरेसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी अगोदरच खबरदारी घेण्यात आली आहे. या धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल पाठवण्यात आला आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बौद्धवाडी, चर्मकारवाडी आणि खालच्या वाडीतील लोक रात्री जागे राहून पहारा करीत आहेत.

ग्रामस्थ भयभीत असल्यामुळे धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून पाणी सोडण्यात येत आहे. पाटबंधारेचे उपअभियंता एस. के. सोनवणे, शाखा अभियंता प्रकाश खताते व सहकारी यांनी धरणाची पाहणी केली.आमदार सदानंद चव्हाण यांनी मोरवणे धरणाकडे जाताना ग्रामस्थांशी संवाद साधला. या धरणावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा, सांडवा तसेच जॅकेवलची दुरुस्ती करावी, झाडीझुडपे तोडण्यात यावी, भिंतीचे अर्धवट पिचिंगचे काम पूर्ण करावे, अशा सूचना केल्या. येथील कालव्याला ठिकठिकाणी गळती असल्याने हे पाणी शेतात घुसून नुकसान होणार असल्याने जेसीबी आणून कालव्याला बांध घालण्यात आला आहे.चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजू जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष समीर काझी, काँग्रेसचे युवक अध्यक्ष फैसल पिलपिले, मोरवणेचे माजी सरपंच चंद्रकांत जाधव, जितेंद्र शिंदे आदींनी धरणाची पाहणी केली.कालव्याला बांधया धरणाच्या कालव्यांना ठिकठिकाणी गळती लागली असून, त्यामुळे हे पाणी शेतात घुसून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात या कालव्याला बांध घालण्यात आला आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी