जयगडमधून चिपळूणवासीयांसाठी पाण्याचे टॅंकर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST2021-07-27T04:32:49+5:302021-07-27T04:32:49+5:30
गणपतीपुळे : चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रत्नागिरी तालुक्यातील जयगड पोलीस स्थानक व जिंदल उद्योग समूहाने पुढाकार घेतला आहे. ...

जयगडमधून चिपळूणवासीयांसाठी पाण्याचे टॅंकर रवाना
गणपतीपुळे : चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रत्नागिरी तालुक्यातील जयगड पोलीस स्थानक व जिंदल उद्योग समूहाने पुढाकार घेतला आहे. या भागातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाण्याचे टँकर पाठवले आहेत.
चिपळूण येथील पूरग्रस्त भागात विविध ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू आहे. जयगड पोलीस स्थानक व जिंदल उद्योग समूहाने पाण्याचे टॅंकर पाठवले आहेत. यापूर्वी जयगड पोलीस स्थानक, जिंदल उद्योग समूह व स्थानिक मच्छीमार यांच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन बोटी व तटरक्षक दल सदस्यांची टीम पाठविण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत जयगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक नितीन ढेरे व पोलीस नाईक सचिन वीर यांनी विशेष पुढाकार घेऊन पाण्याचे टॅंकर पाठवले आहेत. यासाठी टँकर मालक विवेक सुर्वे (संदखोल), सुनील सुर्वे (सांडेलावगण) यांचे सहकार्य मिळाले. तसेच जयगड येथील प्रसाद उर्फ अण्णा झगडे, बसवराज पुजारी, सुनील जोशी यांचेही सहकार्य लाभले.