रत्नागिरी शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद
By मेहरून नाकाडे | Updated: June 30, 2024 15:26 IST2024-06-30T15:26:07+5:302024-06-30T15:26:21+5:30
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून पावसाळा सुरू झालेनंतर शहरात नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र सोमवार दि. १ जुलै रोजी देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
पाणी टंचाईमुळे मे महिन्यात एक दिवस आड पाणीपुरवठा शहरात करण्यात येत होता. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत जोराचा पाऊस सुरू असल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे. जून महिन्यात जोरदार पडलेल्या पावसामुळे शीळ धरण भरून वाहू लागले आहे. मोठा पाऊस पडत असल्याने नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शीळ जॅकवेल आणी साळवी स्टाॅप येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल दुूरूस्तीसाठी सोमवार दि.१ जुलै रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे सोमवारी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.