शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरवासीयांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना, गुढीपाडव्यानंतर पाणीपुरवठा वेळेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:39 IST

राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते

राजापूर : वाढते उष्ण तापमान, वातावरणातील बदल यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्यानंतर २३ मार्चपासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करून एक तासाऐवजी पाऊण तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे. ही माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. रानतळे परिसरात आतापासूनच विंधन विहिरीला पाणी कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावरच शहरवासीयांना पाणीपुरठा करावा लागणार आहे.आता कोदवली येथील जुने धरण व शीळ जॅकवेलकडून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. कोदवली धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे. तर शीळ जॅकवेलकडून २४ तास विद्युत पंपाने तालीमखाना साठवण टाकीत पाणी खेचले जात आहे. मात्र, पावसाळा साधारण १५ जूनपासून सुरू होणार असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यात शहराला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनाला पेलावे लागणार आहे.नळाद्वारेच पाणीपुरवठानगरपरिषद प्रशासनाने प्राथमिक तयारी केली असून, शहरवासीयांना टंचाई काळात जास्तीत जास्त नळाद्वारेच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. कोदवली धरणाच्या वरील बाजूला दोन बंधारे बांधून पाणी साठविण्यात आले आहे. हा पाणीसाठा धरणात सोडून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, तो पुरेसा नाही. उपलब्ध पाणीसाठ्यावर यावर्षी टँकर न वापरता पाणीपुरवठा सुरळीत करता येतो का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कोदवली धरणातील गाळ उपसणारनाम फाउंडेशनच्या सहकार्यातून कोदवली धरणात साचलेला गाळ उपसून पाणीसाठा करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. मात्र, धरणातील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर गाळ उपशाचे काम करणे शक्य आहे. मे महिन्यात या धरणात साचलेला गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशांत भोसले यांनी सांगितले.

निधीअभावी काम रखडले

काेदवलीतील नवीन धरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. त्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यालाही निधी उपलब्ध होताच काम पूर्ण होणार आहे. मात्र, यावर्षी शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार एवढे मात्र नक्की.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी