पाणी मुबलक, पण पुरवठ्यात व्यत्यय

By Admin | Updated: April 22, 2015 00:24 IST2015-04-21T23:33:48+5:302015-04-22T00:24:58+5:30

रत्नागिरीतील विहिरी : शीळ धरण भागविणार रत्नागिरीकरांची तहान

Water is abundant, but interrupted supply | पाणी मुबलक, पण पुरवठ्यात व्यत्यय

पाणी मुबलक, पण पुरवठ्यात व्यत्यय

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात यंदाही मुबलक पाणी आहे. हे पाणी आॅगस्ट २०१५ पर्यंत पुरेल, असे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, साठा मुबलक असूनही पाणी वितरण वाहिन्या जुनाट असून, कुचकामी ठरत असल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. पाणी वितरण व्यवस्थेचे उपग्रहाद्वारे जीआयएस मॅपिंग झाले असून, सुधारणा व दुरुस्तीसाठी ५७ कोटींचा निधी सुजल योजनेतून नगरपरिषदेला मिळणार आहे.
शहराला १९६५ पासून पानवल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर चिपळूण पाटबंधारेच्या ताब्यातील शीळ धरणातून शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा केला जात आहे. नाचणे तलावातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. एमआयडीसीकडूनही १००० घनमीटर पाणी घेतले जाते. मात्र, पानवल धरणातून फेबु्रवारीअखेरपर्यंतच पाणी उपलब्ध होते. त्यानंतर हे धरण आटत असल्याने अधिकचे पाणी शीळ धरणातून घेतले जाते.
सध्या रत्नागिरी शहराला १४.२ दशलक्ष घनलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी १३००० घनमीटर पाणी हे केवळ शीळ धरणातून विद्युत पंपाद्वारे लिफ्ट करून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्रात आणले जाते, तर १००० घनमीटर पाणी एमआयडीसीकडून घेतले जाते. नाचणे तलावातून केवळ ०.०५ घनमीटर पाणी मिळते.
गेल्या काही वर्षांत रत्नागिरीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण पडताना दिसत आहे. शहरातील अपार्टमेंट्सची संख्या वाढत आहे. शहराची लोकसंख्याही काही प्रमाणात वाढली आहे. रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्हाभरातून कामाच्या निमित्ताने हजारो लोक दररोज शहरात येतात. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे परंतु शहराच्या बाहेर राहणारे असंख्य कर्मचारीही आहेत. या सर्व लोकसंख्येचा शहरातील अन्य सुविधांबरोबरच पाणी पुरवठा सुविधेवर परिणाम होतो. त्यामुळेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे.
सद्यस्थितीत रत्नागिरी शहरात ९,२०२ नळजोडण्या असून, त्यासाठीचे संपूर्ण वितरण जाळे मात्र खूप जुने आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांचे जाळे कुचकामी झाले आहे. जीआयएस मॅपिंगच्यावेळी शहरातील या पाणी वितरण करणाऱ्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, जलवाहिन्या पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सुजल योजनेतून शहरातील जलवाहिन्यांची दुरुस्ती, आवश्यक तेथे नवीन जलवाहिन्या टाकणे, शीळ धरणापासून पुढे ५०० मीटर्सपर्यंतची मोठी जलवाहिनी जागोजागी गंजल्याने सातत्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होतात. त्यातून पाणीही मोठ्या प्रमाणात वाया जाते. पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे काही दिवस पाणीपुरवठा ठप्प होतो. ही जलवाहिनी बदलण्याबाबतचा प्रस्ताव आहे. एकूणच सुजल योजनेतून ५७ कोटीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शासन दरबारी या प्रस्तावाबाबत सातत्याने पाठपुरावा करुन रत्नागिरी शहरातील पाणी व्यवस्थेची दुरुस्ती, नूतनीकरण लवकरात लवकर कसे होईल, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पुरेसे पाणी असूनही ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, ही स्थिती बदलण्याची मागणी होत आहे.


पाणीसाठवण टाक्या व क्षमता
रत्नागिरीतील विहिरी
खासगीसार्वजनिक
३५१८
पाणीपट्टी कर३ कोटी
नळजोडण्या९,२०२
दरडोई पाणीपुरवठा१३५ ली.
आवश्यक दरडोई पाणीपुरवठा
७० लीटर
वितरण जलवाहिन्यांची लांबी
१४० कि. मी.
जलशुद्धीकरण प्रकल्पसाळवी स्टॉप, नाचणे
पाणी वितरणासाठी येणारा खर्च (महिना)
वीजबिलासह१९ लाख
शहरातील विभागवार
पाणीमोजणी मीटर्स९
पाणी व्यवस्था कर्मचारी
नियमीत२२
कंत्राटी४०

पाणीसाठवण टाक्या व क्षमता

Web Title: Water is abundant, but interrupted supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.