विठ्ठलवाडी गणेशोत्सव मंडळाकडून काेराेना याेद्धयांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST2021-09-22T04:34:57+5:302021-09-22T04:34:57+5:30

अडरे : चिपळूण शहर खेर्डी व कळंबस्ते परिसरात महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून योगदान ...

Vitthalwadi Ganeshotsav Mandal honors Kareena Yadav | विठ्ठलवाडी गणेशोत्सव मंडळाकडून काेराेना याेद्धयांचा सन्मान

विठ्ठलवाडी गणेशोत्सव मंडळाकडून काेराेना याेद्धयांचा सन्मान

अडरे : चिपळूण शहर खेर्डी व कळंबस्ते परिसरात महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून योगदान दिले. या ५० योद्ध्यांचा खेर्डीतील विठ्ठलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सन्मानचिन्ह, भेटवस्तू व प्रमाणपत्र देत गौरव त्यांचा करण्यात आला.

खेर्डी येथील विठ्ठलवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. गणेशाेत्सवात गुणवंतांचा सत्कार केला जातो. या वर्षी मंडळातर्फे महापुरात ज्यांनी जिवाची बाजी लावून काम केले, अशा योद्ध्यांचा गौरव केला आहे. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात चिपळूण व खेर्डी परिसरातील सुमारे ५० योद्ध्यांना मंडळातर्फे भेटवस्तू, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि काजूचे रोप, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मंडळाचे आधारस्तंभ दशरथ दाभोळकर म्हणाले की, या योद्ध्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या लोकांची सुटका केली. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कोरोनाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन पुरविणाऱ्या हेल्पिंग हँड या संस्थेला ही मंडळातर्फे आर्थिक मदत करण्यात आली. आमदार शेखर निकम यांनीही मंडळाच्या कार्याचा गौरव केला. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये कार्यकर्ते झोकून देत मदतकार्यात उतरतात ही अभिमानाची बाब आहे. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे,उपाध्यक्ष राकेश प्रजापती, प्रशांत दाभोळकर, विकास ढवण, राकेश दाभोळकर,रियाझ खेरटकर, प्रणाली दाभोळकर, आपाजी दाभोळकर, संभाजी यादव, सचिन भोसले, विकास पवार,तुषार मिरगल, राजा वाडकर, आबु यादव, संतोष मिरगल, शरद पवार, जयेश वाडकर, धनाजी वाडकर साईराज वाडकर, सुमित पवार, सुशांत पवार, विकास पवार, सुरेश वाडकर, पंड्या वाडकर, भीमराव पवार, निखिल वाडकर, विवेक दाभोळकर, काशिनाथ वाडकर उपस्थित होते.

Web Title: Vitthalwadi Ganeshotsav Mandal honors Kareena Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.