सिद्धेश्वर पुस्तके यांची एसीबी स्कूलला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:32 IST2021-04-04T04:32:20+5:302021-04-04T04:32:20+5:30
चिपळूण : येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलला अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांनी भेट देऊन संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचे ...

सिद्धेश्वर पुस्तके यांची एसीबी स्कूलला भेट
चिपळूण : येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलला अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांनी भेट देऊन संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोजने, चेअरमन ॲड. अमोल भोजने यांनी स्वागत केले. यावेळी सातारा जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र मुळीक, सामाजिक कार्यकर्ते रमेश नलावडे उपस्थित होते.
एसीबी इंटरनॅशनल स्कूलचा नावलौकिक पश्चिम महाराष्ट्रातही ऐकण्यास मिळत असल्याने, पुस्तके यांनी आवर्जून संस्थेला भेट देऊन येथील उपक्रमांची माहिती घेतली. अल्पावधीच या संस्थेचे चेअरमन ॲड.अमोल भोजने यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली झेप आदर्शवत असल्याचे सांगून भविष्य उज्ज्वल असल्याचे पुस्तके यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नव्याने योजलेल्या शैक्षणिक उपक्रम, तसेच इतर सोईसुविधा याबाबतही चर्चा झाली.