शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
2
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
3
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
4
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
5
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
6
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
7
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
8
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
9
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
10
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
11
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
12
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
13
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा
14
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
15
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
16
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
17
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
18
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
19
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल

‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:53 IST

अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.

रत्नागिरी : मुंबई-गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘कोकण एक्स्प्रेस’ हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महामार्गासाठीरत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी भूसंपादनाच्या माेजणीचे काम ग्रामस्थांनी राेखले. ग्रामस्थांनी या माेजणीला विराेध केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.‘काेकण एक्स्प्रेस’ हा एकूण २२ गावातून जाणार असून, यामुळे मुंबई ते गोवा प्रवास ६ तासात पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प हाती घेतला आहे. कोकणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण ३६३ किलाेमीटर लांबीचा असणार असून, सहा मार्गिकांचा आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत जाणार आहे.या महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून, या मार्गावरील विविध गावांतून भूसंपादन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी माेजणीसाठी अधिकारी दाखल झाले आहेत. सर्व शासकीय यंत्रणा गावात दाखल होताच येथील ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध केला. त्यामुळे या भागात वातावरण तणावपूर्ण बनले हाेते.

या प्रकाराबाबत शिंदेसेनेचे शाखाप्रमुख संदेश बनप यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील यांच्याशी संपर्क साधत भूसंपादन माेजणीची त्यांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार अमरावती दौऱ्यावर असणारे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर टाकण्यात आला. मंत्री सामंत यांनी तत्काळ ही मोजणी थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली. अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया थांबविताच ग्रामस्थांचा विराेध मावळला.

घरे जाऊ देणार नाही : सामंतकाळबादेवीवासीयांची घरे जाऊ देणार नाही, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहे. येत्या दोन दिवसांत मी रत्नागिरीत आल्यावर याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा