गावठी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST2021-03-19T04:31:21+5:302021-03-19T04:31:21+5:30

रत्नागिरी : शहरातील चर्चरोड येथील सुर्वेवाडी येथे चोरट्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून २५० रुपयांची ५ लीटर दारू जप्त ...

Village liquor confiscated | गावठी दारू जप्त

गावठी दारू जप्त

रत्नागिरी : शहरातील चर्चरोड येथील सुर्वेवाडी येथे चोरट्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून २५० रुपयांची ५ लीटर दारू जप्त केली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी २.०५ वाजण्याच्या दरम्याने करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस नाईक नंदकुमार सावंत पेट्रोलिंग करत असताना सुर्वेवाडी येथे एका ठिकाणी गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. सुर्वेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत जात असताना जयप्रकाश मयेकर यांच्या घरामागील मोकळ्या जागेत एक व्यक्ती प्लॅस्टिकचा कॅन घेऊन बसलेला दिसला. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू सापडली. या प्रकरणी भारत विजय गुरव (वय ४१, रा. झाडगाव जोगेश्वरी मंदिरजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Village liquor confiscated