वेदांती राव हिचे ऑनलाइन कथाकथन स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:19+5:302021-06-05T04:23:19+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका संगमेश्वरच्या वतीने शिवाजीराव भोसले एज्युकेशन सोसायटी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन कथाकथन ...

वेदांती राव हिचे ऑनलाइन कथाकथन स्पर्धेत यश
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका संगमेश्वरच्या वतीने शिवाजीराव भोसले एज्युकेशन सोसायटी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन कथाकथन स्पर्धा भाग -२ घेण्यात आली. यात वेदांती राव हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
या ऑनलाइन स्पर्धेत १८० स्पर्धकांनी घेतला होता. चतुर्थ क्रमांक मिळविल्याबद्दल वेदांती राव हिचा सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शिक्षक परिषद तालुका अध्यक्ष अनंतकुमार मोघे व जिल्हा कार्याध्यक्ष किरण मुकुंद देशपांडे, प्रा. संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वेदांतीची आई व वडील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
फोटो मजकूर
ऑनलाइन स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळविल्याबद्दल वेदांती राव हिचा सत्कार करताना शिक्षक परिषद तालुका अध्यक्ष अनंतकुमार मोघे. समवेत जिल्हा कार्याध्यक्ष किरण मुकुंद देशपांडे, प्रा. संजय कुलकर्णी आदी.