बारामतीचा वासुदेव रत्नागिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:40+5:302021-03-31T04:31:40+5:30
रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि ...

बारामतीचा वासुदेव रत्नागिरीत
रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि तरीही ज्ञान, लोकशिक्षणाचा वसा समाजामध्ये अखंड रुजविणारे वासुदेव म्हणजे लोककलेचा जिवंत उदाहरण आहे. मात्र, पायाला चाक लागल्यासारखे अनेक मैल पायी प्रवास करणारे हे वासुदेव काळाच्या ओघात हरवून जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच मूळचे बारामतीचे असलेले आणि सध्या जेजुरीला वास्तव्य असलेल्या सोमनाथ गीताराम घाडगे रत्नागिरीत वासुदेव म्हणून फिरतात, तेव्हा अनेकांची नजर आश्चर्याने त्यांच्याकडे वळते.
रामप्रहरी दारी जणू ईश्वराची वाणी घेऊन येणारे वासुदेव जुन्या काळी जीवनाचा अविभाज्य घटक होते. त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञानच नव्हे, लोकशिक्षणही घरोघरी पोहोचत होते. स्वराज्याच्या रणसंग्रामात हेच वासुदेव स्वराज्याचे पाईक म्हणवून घेत, हेरगिरीही करत होते. समाजाचा एक अविभाज्य घटक होते. मात्र, हळूहळू काळ बदलल्यानंतर मात्र समाजाला वेग आला, तरी वासुदेव मात्र काळाच्या ओघात हरवून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वासुदेव म्हणजे काय, असा प्रश्न नव्या पिढीला पडावा, इतके त्याचे दर्शन दुर्मीळ झाले असताना रत्नागिरीत वासुदेवाची स्वारी अवतरली. बारामतीचे सोमनाथ घाडगे आणि त्यांच्या परिवाराने ही परंपरा कायम राखली आहे. ते सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगा उतरून कोकणात आले आहेत. यामध्ये जनजागृती हा त्यांचा मुख्य हेतू असून, केवळ याच वर्षी नव्हे, तर दरवषी घाडगे परिवाराचा सदस्य वासुदेवाचे दर्शन कोकणवासीयांना रामप्रहरी करून देण्यासाठी येत आहेत.
पूर्वी लाेकांच्या मनात वासुदेवाबद्दल आस्था होती. काळाच्या ओघात ही आस्था कमी झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली, तरीही आपले वडिलोपार्जित कर्तव्य आपण आणि आपला परिवार करतच असल्याचे त्यांनी सांगितले.
...................
फोटो आहे.