पोफळी येथे आज विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST2021-03-28T04:29:26+5:302021-03-28T04:29:26+5:30

अडरे : आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा साळवी व युवा नेते, पंचायत समिती सदस्य बाबू ...

Various events today at Pofli | पोफळी येथे आज विविध कार्यक्रम

पोफळी येथे आज विविध कार्यक्रम

अडरे : आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा साळवी व युवा नेते, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्या प्रयत्नाने पोफळी येथे रविवार, दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता विविध विकासकामांची भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

युवा नेते बाबू साळवी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वासने या कामांमधून पूर्ण होणार आहेत. यावेळी पोफळी सय्यदवाडी ते कोंडफणसवणे नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. ही मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. याची दखल घेऊन राष्ट्रवादीचे नेते दादा साळवी व बाबू साळवी यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा केला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. पोफळी बौद्धवाडी रस्त्याचे डांबरीकरण काम व ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन, पोफळी नाका येथील सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन, घनकचरा व्यवस्थापन ट्रॅक्टरचे लोकार्पण, पोफळी होडेवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ असे कार्यक्रम यावेळी होणार आहेत. ग्रामपंचायत इमारतीत ग्रंथालय, मंगल कार्यालय, पुरुष व महिलांसाठी जिम, व्यापारी गाळे आदी सुविधा आहेत.

हे सर्व कार्यक्रम आमदार शेखर निकम, सभापती पांडुरंग माळी, महाजनकोचे मुख्य अभियंता अजय बामणे, माजी सभापती पूजा निकम, धनश्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच तेजस्विनी मानकर, उपसरपंच अब्दुल्ला सय्यद, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Various events today at Pofli