शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day 2018 : रत्नागिरीत दुकाने सजली, २० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतची ग्रिटींग्ज बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:44 IST

व्हॅलेंटाईन डे  बुधवारी १४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याने रत्नागिरी शहरातील गिफ्ट शॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेटस् विक्रीसाठी आली आहेत. बुधवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने युवक-युवतींची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत व्हॅलेंटाईन डेसाठी दुकाने सजली२० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतची ग्रिटींग्ज बाजारातविविध पिलोही उपलब्ध.

रत्नागिरी : व्हॅलेंटाईन डे  बुधवारी १४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याने रत्नागिरी शहरातील गिफ्ट शॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेटस् विक्रीसाठी आली आहेत. बुधवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने युवक-युवतींची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.प्रेमाचा दिवस साजरा करताना युवक-युवती यादिवशी आपल्या प्रियजनांना छानशी भेट देतात. पती-पत्नीसाठीही हा दिवस खास आहे. परगावी राहणाऱ्यांना प्रेमाचे संदेश देण्याकरिता भेटकार्डदेखील बाजारात उपलब्ध आहेत. २० रूपयांपासून २५० रूपयांपर्यतची ग्रिटींग्ज बाजारात उपलब्ध आहेत.हार्टशेप, लिपशेप पिलोदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी गुलाबी, लाल रंगाचे वेलव्हेटचे छोट्या-मोठ्या आकारातील पिलो एकमेकांना भेट देण्यात येतात. २५० रूपयांपासून २५०० रूपयांपर्यंत या पिलोंच्या किंमती आहेत. गिफ्ट शॉपीबाहेर अडकवण्यात आलेल्या या पिलो ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

याशिवाय अन्य भेटवस्तूदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कृत्रिम गुलाबाची फुले तसेच गुलाबाच्या फुलांमध्ये अंगठीची डबी असलेली फुले यांनादेखील मागणी होत आहे. सध्या व्हॅलेंटाईन डेवर बंधन नसल्यामुळे युवक-युवती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खुलेआम भेटवस्तूंची खरेदी करत आहेत. 

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेRatnagiriरत्नागिरी