नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:14 PM2018-02-13T17:14:00+5:302018-02-13T17:14:07+5:30

Sajla Bazar on 'Valentine's Day' in Nandurbar | नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजला बाजार

नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजला बाजार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बाजार चांगलाच सजला असल्याचे दिसून येत आह़े  सात दिवसाचे सात वेगवेगळे ‘डे’ साजरा करतांना त्यासाठी लागणा:या साहित्याचीही मोठी विक्री होत आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भातील विरोधाचा सूर उमटू लागल्याने विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे.
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमदिन साजरा होतो. त्यानिमित्ताने तरुणाईमध्ये गेल्या आठवडय़ापासूनच उत्सूकता आणि उत्साह दिसून येत आहे. त्या आधीच्या सात दिवसात विविध डे साजरा करण्याचेही फॅड असल्यामुळे ते देखील साजरा केले जात आहेत. गेल्या तीन दिवसात रोझ डे,  प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी ड साजरा करण्यात आला. रविवारी प्रॉमीस डे, सोमवारी किस डे तर मंगळवारी हग डे साजरा होणार आहे. बुधवारी व्हॅलेंटाई डे साजरा होईल. रोझ डे च्या दिवशी  मोठय़ा प्रमाणावर गुलाबाचे फूल विकले गेले होते. येथील विक्रेत्यांनी शिर्डी येथून फुलांची मागणी केली होती. 
दररोज दोन ते तीन रुपयांना विकले जाणारे गुलाबाचे फूल त्या दिवशी पाच ते दहा रुपयांना विकले गेले. चॉकलेट डे ला अर्थात             शुक्रवारी चॉकलेटलाही मोठी              मागणी होती. विविध कंपन्यांनी त्यासाठी विशेष पॅकींगमध्ये चॉकलेट उपलब्ध करून दिले होते. दहा रुपयांपासून 200 रुपयांर्पयत चॉकलेट बाजारात उपलब्ध होते.      टेडी डेसाठी देखील मोठय़ा            प्रमाणावर विविध आकार व प्रकारातील टेडी गिप्ट स्वरूपात विक्रीस आले होते. 50 रुपयांपासून 500 रुपयांर्पयतचे टेडी येथील बाजारात उपलब्ध होते.  
व्हॅलेंटाईन डे ला भेट म्हणून दिले जाणारे किचेन, बेल्ट, ब्रासलेट, घडय़ाळ, अंगठी, नेकलेस विविध आकार व प्रकारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यांनाही मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे येथील विक्रेते योगेश चौधरी यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षापासून काही पक्ष व संघटना व्हॅलेंटाईन डे ला विरोध करीत आहेत. हा दिवस साजरा होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून प्रबोधन देखील केले जात होते. त्यामुळे या दिनानिमित्त विक्री होणा:या वस्तूंवर देखील मोठा परिणाम होत होता. यंदा मात्र सर्वत्र शांतता असल्यामुळे विक्रेत्यांमध्येही समाधान आहे. परंतु नेहमीच्या अनुभवाप्रमाणे काही विक्रेत्यांनी अशा वस्तू विक्री होत नसल्याचा मागील अनुभवावरून कमी प्रमाणात अशा वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. 
 

Web Title: Sajla Bazar on 'Valentine's Day' in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.