Valentines Day: Celebrate your day in latest style | Valentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग'
Valentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग'

- गीता खेडेकर

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमवीरांच्या, प्रियकर-प्रेयसीच्या हक्काचा दिवस. या प्रेमदिनी, म्हणजेच १४ फेब्रुवारीला आजूबाजूला  प्रेमाचा लाल रंग खुलून आलेला दिसतो. एखाद्याने 'व्हॅलेंटाईन डे'ला लाल रंगाचे कपडे घातले की, ती किंवा तो 'कमिटेड' आहेत किंवा 'डेट'वर आहे हे लगेच आपल्याला समजतं. पण, या दिवसाला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं?  त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा.

ट्विनिंग-
कधी कधी योगायोगाने आपला ड्रेस कोणासोबत मॅचिंग झाला तर आपण 'इंच का पिंच' किंवा 'सेम टू सेम' असं म्हणतो. यालाच ट्विनिंग ड्रेस असं म्हणतात. यात तुम्ही एकसारखी प्रिंट, रंगाचे कपडे घालू शकता. कपड्यांपासून चपलेपर्यंत तुम्ही मॅच अप करू शकता.  ट्विनिंग स्टाइल करताना अगदी सेम टू सेम कपडे असल्यास उत्तम. 

कपल टीशर्ट-
कपल टीशर्ट दिसायला अगदीच नेहमीच्या टी-शर्टसारखे असतात . फक्त यावर कपल्सशी संबंधित कोट्स लिहलेले असतात, ते अर्धे-अर्धे. दोन्ही टीशर्ट्स बाजूबाजूला असल्याशिवाय त्यावरील मेसेज पूर्ण होत नाही. यात कोट्सशिवाय ईमोजीही असतात. उदा. प्रिन्स-प्रिन्सेस, शी इज माईन-ही इज माईन वैगरे. बाजारात अनेक रेडिमेड कपल टीशर्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुम्हाला हवे असलेले मेसेजेस लिहून कस्टमाइज टीशर्ट्सही ऑर्डर करू शकता. 

कपल अॅक्सेसरीज -
तुम्हाला तुमचं रिलेशनशिप स्टेट्स लपवून ठेवायचं असेल किंवा सिक्रेट डेटला जायचा प्लॅन असेल तर मग कपल ऍक्सेसरीज हा मस्त पर्याय आहे. यात पेंडेंट, फिंगर रिंग, ब्रेसलेट घड्याळ, मोबाइल कव्हर्स यांसारख्या सहजासहजी न कळणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो.

जॅकेट स्टाईल-
ट्विनिंग किंवा कपल टीशर्टला हटके व्रीस्ट कोट, जीन्स किंवा बॉम्बर जॅकेट त्यावर घाला. हल्ली सहजतेने ही जॅकेट्स बाजारात मिळतात. जॅकेट्स घेताना गडद-फिकट अशी कॉन्ट्रास्ट रंगसंगती निवडा.


Web Title: Valentines Day: Celebrate your day in latest style
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.