चिपळुणात आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:40+5:302021-06-01T04:23:40+5:30
अडरे : चिपळूण शहरातील मार्कंडी येथे असलेल्या एल टाईप शाॅपिंग सेंटर व नगरपरिषदेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या पोलीस वसाहत ...

चिपळुणात आज लसीकरण
अडरे : चिपळूण शहरातील मार्कंडी येथे असलेल्या एल टाईप शाॅपिंग सेंटर व नगरपरिषदेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या पोलीस वसाहत हाॅल येथे दिनांक १ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ४५ वर्षांवरील नागरिकांना काेविशिल्ड लस देण्यात येणार आहे़ दाेन ठिकाणी ६०० लसीच्या मात्रा ठेवण्यात येणार आहे़त
शहरात सध्या कोरोनाचा वेग वाढत आहे. याची खबरदारी म्हणून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. एल टाईप शॉपिंग सेंटर येथे ४०० तर पोलीस वसाहत हाॅल येथे २०० असे ६०० डोसचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.