खेड तालुक्यातील १० लसीकरण केंद्रांवर २८५६ लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:44+5:302021-03-23T04:33:44+5:30

khed-photo221 खेड: तालुक्यात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांला लस देताना आरोग्य विभागाचे कर्मचारी. लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : ...

Vaccination of 2856 beneficiaries at 10 vaccination centers in Khed taluka | खेड तालुक्यातील १० लसीकरण केंद्रांवर २८५६ लाभार्थ्यांना लस

खेड तालुक्यातील १० लसीकरण केंद्रांवर २८५६ लाभार्थ्यांना लस

khed-photo221 खेड: तालुक्यात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांला लस देताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : तालुक्यातील १० लसीकरण केंद्रांवर १९ मार्चपर्यंत सुमारे २,८५६ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. २५ जानेवारी रोजी तालुक्यातील लसीकरण मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात केवळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली होती. या टप्प्यात फक्त आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांना कोरोनाची लस दिली गेली.

आरोग्य विभाग, महसूल, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक आदी कर्मचारी व अधिकारी वर्गाला

फ्रंटलाईन वर्कर म्हणून लसीकरण करण्यात आले. या टप्प्यात सुमारे १,७०० पेक्षा जास्त वर्कर्संनी लाभ घेतला.

कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाल्यानंतर सामान्य नागरिकांना ८ मार्चपासून लसीकरण करण्यास आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, खेड नगर परिषद दवाखाना व कळंबणी उपजिल्हा रुग्णालय अशा एकूण १० ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये जनतेसाठी करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर यासारख्या रोगांनी त्रस्त असणाऱ्या ४५ ते ५९ या वयोगटातील आणि ६० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे.

तालुक्यातील ४५ ते ५९ या वयोगटात सुमारे ७,७०० लाभार्थी असून, ६० पेक्षा अधिक वयाचे ३१,४२३ असे एकूण ३९,१२३ लाभार्थी आहेत. यामध्ये तळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४,५०७, फुरुस केंद्रात ५,८४३, कोरेगाव ३,२०४, आंबवली ४,४३६, लोटे ५,०२७, वावे ३,३४०, शिव बु. ४,००६, तिसंगी २,३०० व खेड नगर परिषद अंतर्गत ६,४६० लाभार्थ्यांचा समावेश आहे. ८ मार्चपासून कळंबणी उपजिल्हा रुग्णालय वगळता उर्वरित आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे व नगर परिषद दवाखान्यात आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यात ६ दिवस लसीकरण करण्यात आले असून, आतापर्यंत १,१५६ सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये तळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १२५, फुरुस केंद्रात १२०, कोरेगाव १४५, लोटे १२६, वावे २९, शिव बु. ६०, तिसंगी २९५, खेड नगर परिषद अंतर्गत १९४ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे ६२ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेत सर्व लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहभागी होऊन आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी केले आहे.

Web Title: Vaccination of 2856 beneficiaries at 10 vaccination centers in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.