शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

US-Israel-Iran war: कानठळ्या बसणारे आवाज...भूकंपाप्रमाणे हादरे; रत्नागिरीतील दुबईस्थित तरुणांनी कथन केला अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:37 IST

दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द; बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट, प्रशासनाच्या सूचनेचे पालन

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : क्षेपणास्त्राच्या माऱ्यामुळे कानठळ्या बसवणारे आवाज, भूकंपाप्रमाणे इमारतीला जोरदार हादरे यामुळे भीतीजन्य वातावरण आहे. दुबई प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेबाबत काटेकोर आहे. प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ केल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे. ‘कर्फ्यू’ लागल्याप्रमाणे चित्र आहे. आम्ही सुरक्षित आहोत; परंतु भीती तर आहेच, असे दुबईतील मीना बाजार येथे राहणाऱ्या रत्नागिरीचे सुपुत्र फईम नागलेकर आणि साहिल नाकाडे यांनी सांगितले.नाेकरीनिमित्त गेले काही वर्षे फईम नागलेकर आणि साहिल नाकाडे हे दुबई येथे वास्तव्याला आहेत. त्यांनी सांगितले की, गेले दोन दिवस आवाजांची भीती वाटत आहे. जोराचे आवाज येतात; परंतु दिसत काहीच नाही. मात्र, फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून, टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.प्रशासनाने रविवारप्रमाणे सोमवारीही ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. प्रशासनाने घराबाहेर न पडण्याची सूचना केल्यामुळे येथील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इमारतींच्या आवारातील दुकानांमधून खरेदी केल्यामुळे बहुतांश सामान संपले आहे, असेही दाेघांनी सांगितले.

दहावी, बारावीच्या परीक्षा रद्दसाेमवारपासून शाळा महाविद्यालयांचे अध्यापन ऑनलाइन होणार आहे. येथील सीबीएसई माध्यमाच्या बोर्डाच्या सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बहुतांश कार्यालयांनी ऑनलाइन कामकाजाची सूचना केली असल्याची माहिती फईम नागलेकर आणि साहिल नाकाडे यांनी दिली.

शाळा, कार्यालय ऑनलाइनयुद्धस्थिती असली तरी प्रशासनाकडून नागरिकांना सातत्याने दिलासा दिला जात आहे आणि अफवा पसरवणाऱ्यांना मजबूत आर्थिक दंड आणि एक वर्षाची कारावासाची शिक्षा केली जाईल, असे सांगून अफवा न पसरवण्याचे आवाहन केले जात आहे. सोमवारपासून शाळा आणि कार्यालय ऑनलाइनच सुरू राहणार आहेत. तशी सूचना सर्वांना देण्यात आली आहे. मात्र, येथील परिस्थिती शांत आहे, अशी माहिती अबुधाबी येथे योग शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या रत्नागिरीतील तृप्ती महेश मोरे यांनी दिली.

युद्ध स्थिती, पण सुरक्षितशनिवारचा दिवस खूपच तणावपूर्ण होता, सकाळपासून दर तासांनी मिसाइल दिसत होती. अर्थात सगळी नष्ट केली गेली. आज रविवारी सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होम आहे! सकाळी आठनंतर थोडी शांतता आहे. शहरातील जवळजवळ चाळीस डिपार्टमेंटल स्टोअर्स २४ तास सुरू ठेवण्यात आली आहेत. युद्ध स्थिती असली तरी आम्ही सर्व सुखरूप आहोत, असा अनुभव कतार येथे असलेल्या रत्नागिरीकर मनोज पानवळकर यांनी आपल्या मित्रांसोबत शेअर केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US-Israel-Iran War: Ratnagiri residents in Dubai recount terrifying experiences.

Web Summary : Ratnagiri natives in Dubai describe frightening missile attacks, রেড alerts, and deserted streets. Schools and offices shift online. Qatar-based resident assures safety amidst the war situation, departmental stores open 24 hours.