शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ३१.८९ लाखांचे नुकसान; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:39 IST

रत्नागिरी : मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. ...

रत्नागिरी : मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. या कालावधीत वीज पडून एक व्यक्ती मृत्यू पावली तर सहा जखमी झाले आहेत. तसेच रत्नागिरी तालुक्यात भिंत पडून आणि गुहागर तालुक्यात झाड पडून ३ जण जखमी झाले.यंदा मे महिन्यातच ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह पडलेल्या या पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे. तसेच शेतमळ्यांमध्ये पाणी भरल्याने आता पेरणी कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यापासून पावसाने जिल्हाभर जोरदार हजेरी लावली आहे.मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरूवातीपासून सलग सुरू झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात ८ पक्क्या घरांचे पूर्णत: १,०९,८५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. ५२ पक्क्या घरांचे २४ लाख ९९ हजार ३९४ रुपयांचे नुकसान केले आहे.या पावसाने गोठ्यांचेही नुकसान केले आहे. जिल्ह्यात ४ गोठ्यांचे अंशत: २ लाख ७ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर २ गोठ्यांचे पूर्णत: ३,७३,५० रुपयांचे नुकसान केले आहे. लांजा येथे वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले. तसेच रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथे संरक्षक भिंत पडून ३ जण जखमी झाले. तर गुहागर तालुक्यातील आबलोली येथे झाड पडून ३ जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस