शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांची मोजणी

By admin | Updated: November 1, 2015 00:09 IST

अलोरे कोयना प्रकल्प : बाजारपेठेतील व्यापारी गाळ्यांना कारवाईच्या नोटीस

शिरगांव : अलोरेतील कोयना प्रकल्प शासकीय वसाहत बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामाबाबत कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाने कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. स्थानिक पातळीवर झालेल्या मतभेदातून परस्पर विरोधी निवेदन शासनाकडे देण्याचे प्रकारही वाढीस लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी बाजारपेठेतील व्यावसायिक गाळयांची मोजणी करण्यास प्रारंभ केला आहे. १९६० ते ६५ सालापासून विविध भागातून व्यापार करण्यास आलेल्या व्यापाऱ्यांसह स्थानिकांनी आपल्या व्यावसायिक जागेचा गरजेनुसार विस्तार केला आहे. हा विषय सर्वश्रूत असताना अलिकडच्या दोन वर्षात अचानक तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. जुन्या परिपत्रक, कराराकडे बोट दाखवत प्रत्येक ठिकाणी अन्यायच झाल्याचा कांगावा करत शासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर का करता? असा सवाल विचारला जात आहे. सत्ताधीशांच्या सूचनेवरुन तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलेली तडजोड आज खुर्चीत असलेल्या अधिकाऱ्यांना त्रासाची ठरत आहे. विनावापर संपादीत जमीन परत द्या ही प्रकल्पग्रस्तांची मागणी जोर धरत आहे. मात्र, शासन धोरणात्मक निर्णयच घेत नाही. त्यामुळे माहिती अधिकारातून मिळालेल्या मुद्यावर संघर्ष करण्याचे कार्य जोरदारपणे सुरु आहे. महाराष्ट्रात मोठ्या महानगरपालिका हद्दीतही अनधिकृत झोपड्या कायम करुन दिलेल्या सरकारने ५० वर्ष एकाच ठिकाणी राहिलेल्या व्यापाऱ्यांना निवासासाठी वापरलेली वाढीव जागा कायम केल्यास हा वाद संपू शकतो. तथापि, याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने आजही हा वाद कायम आहे. येथील आजची स्थिती पाहता सरकारी वेतनावर जेवढा खर्च पडतो त्यामानाने काम नाही. पण तणाव मात्र कायम वाढत चालला आहे. (वार्ताहर) शासननियमानुसार करा, अन्यथा खपवून घेणार नाही अलोरे बाजारपेठेत पूर्वसूचना न देता अचानक व्यापारी गाळा चारही बाजूनी मोजण्यास प्रारंभ झाल्यानंतर तेथे वास्तव्य करणारे सरपंच विनोद झगडे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. शासनाचे नियमात असेल ते करा पण कोणाच्याही सूचनेवरुन असे करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले.