चिपळूण (जि.रत्नागिरी) : उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आकले येथे गुरुवारी घडली. जयश्री विजय मोहिते (वय २७, रा.आकले) असे या विवाहितेचे नाव आहे. मूल होत नसल्याच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विजय मोहिते व जयश्री यांचा २०१७ रोजी विवाह झाला होता. जयश्री यांना मूल होत नसल्याने त्या नेहमी तणावात असायच्या. त्या तणावात त्यांनी २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध घेतले होते. त्यांना उपचारासाठी दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २५ रोजी सकाळी ९:४६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
Web Summary : A 27-year-old woman from Ratnagiri district, Maharashtra, died during treatment after consuming rat poison. Jayashree Mohite, married in 2017, was reportedly under stress due to her inability to conceive, leading to the extreme step. Police have registered a case of accidental death.
Web Summary : रत्नागिरी जिले, महाराष्ट्र में एक 27 वर्षीय महिला ने चूहे मारने की दवा खाकर उपचार के दौरान दम तोड़ दिया। जयश्री मोहिते, जिनका विवाह 2017 में हुआ था, संतान न होने के तनाव में थीं, जिसके कारण उन्होंने यह कदम उठाया। पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है।